-
निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अलिबागच्या किनाऱ्यावर धडकले. ते अलिबागच्या दक्षिणेकडे ४० किमी, मुंबईच्या दक्षिणेकडे ९५ किमी तर सुरतच्या दक्षिणेकडे ३२५ किमी अंतरावर होते.
-
रायगडमधून सुमारे १५,००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की, श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबागच्या किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (छायाचित्र – नरेंद्र वासकर)
-
तीव्र स्वरुपातील चक्रीवादळ २० किमी प्रतितास वेगाने किनाऱ्याकडे येत असून वाऱ्याचा वेग हा १०० ते ११० किमी प्रतितास इतका होता. पुढील तीन तासांत हे चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यावरुन मुंबई, ठाण्याकडे सरकणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. (छायाचित्र – दिपक जोशी)
-
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सुरक्षेसाठी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली होती. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
-
चक्रीवादळाच्या तडाख्याचा इशारा देण्यात आल्याने मच्छिमारांनी बुधवारी आपल्या बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून ठेवल्या होत्या. या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला होता. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
-
बुधवारी मुंबईत पाऊस झाल्यानंतर रस्त्यांवर सखल भागांमध्ये पाणी साचले होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर इमारतीचे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये पडलेले प्रतिबिंब. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
मुंबईत बुधवारी २० मीमी ते ४० मीमी इतका पाऊस पडला. दरम्यान, गेल्या १२ तासांध्ये या महानगरातील काही भागांमध्ये सर्वसाधारण पाऊस झाला. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
-
निसर्ग चक्रीवादळाचा इशारा मिळाल्यानंतर बधवार पार्क येथे पार्क केलेल्या आपल्या बोटी मच्छिमारांनी हटवल्या आणि सुरक्षित किनाऱ्यावर नेल्या. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
-
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गुजरातमधील वळसद जिल्ह्यातील तिथल बीच येथे समुद्राला मोठी भरती आली होती. (छायाचित्र – जावेद राजा)
-
सुरत येथे आकाशात जमा झालेले काळे ढग. (छायाचित्र- जावेद राजा)
रायगडच्या किनारपट्टीवर धडकले ‘निसर्ग’ चक्रीवादळ
Web Title: Nisarga cyclone hits the coast of raigad asy