-
निसर्ग चक्रीवादळाने आपले रौद्र रूप दाखवून झाल्यानंतर जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने रस्त्यांवर फुलांचा सडा पडला. (फोटो – अरुल होरायझन)
-
पुण्यातील कँप परिसरातील डॉ. कोयाजी रस्त्यावर पाऊस आणि वारा अशा दुहेरी संगमामुळे गुरूवारी सकाळच्या वेळी फुले रस्त्याच्या कडेला पडली. (फोटो – अरुल होरायझन)
-
सकाळच्या वेळी येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरू आणि दुचाकीस्वारांचे त्या सड्याकडे लगेचच लक्ष जात होते. (फोटो – अरुल होरायझन)
-
पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यावर लाल फुलांचा पडलेला सडा अतिशय नयनरम्य वाटत होता. (फोटो – अरुल होरायझन)
-
वादळ आणि वाऱ्यामुळे निसर्गाचे रौद्र रूप दिसून आले असले, तरी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे सध्या एकूणच हवेत गारवा आला असून रस्त्यावरील ही फुलांची चादर मन प्रफुल्लित करत आहे. (फोटो – अरुल होरायझन)
नयनरम्य दृश्य! रस्त्यावर पडला फुलांचा सडा
Web Title: Pune flower bed formed by petals fallen during the heavy rain and winds vjb