• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. vat purnima 2020 women worship banyan tree social distancing wearing mask sdn

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत महिलांनी जपली वटपौर्णिमेची परंपरा

June 5, 2020 12:56 IST
Follow Us
  • हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. (एक्स्प्रेस फोटो - नरेंद्र वासकर)
    1/10

    हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. (एक्स्प्रेस फोटो – नरेंद्र वासकर)

  • 2/10

    आजच्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. (एक्स्प्रेस फोटो – नरेंद्र वासकर)

  • हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
  • 3/10

    वटपौर्णिमेला वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वी स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. (एक्स्प्रेस फोटो – नरेंद्र वासकर)

  • यंदा मात्र इतर सणांप्रमाणे वटपौर्णिमेवर सणावरही करोनाचे सावट आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
  • बेलापूरमधील महिलांनी मात्र उत्साहात वटपौर्णिमा साजरी केल्याचं पहायला मिळालं. (एक्स्प्रेस फोटो – नरेंद्र वासकर)
  • महिला वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी काही ठिकाणी बाहेर पडल्याचं पहायला मिळालं. यावेळी महिलांनी मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत परंपरा जपल्याचं चित्र पहायला मिळालं. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
  • वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते. त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते. याबरोबरच एकमेकींना वाण दिल्याने आपल्याकडून दान केले जाते असेही म्हणतात. (एक्स्प्रेस फोटो – नरेंद्र वासकर)
  • पुण्यातही महिलांनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
  • याला पौराणिक कथेची जोड असून सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)

Web Title: Vat purnima 2020 women worship banyan tree social distancing wearing mask sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.