• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. nisarga cyclone flagging off relief material trucks by bjp devendra fadanvis sgy

“सरकारच्या कामाला हातभार लावणार”, फडणवीसांनी कोकणासाठी पाठवली १४ ट्रक मदतसामुग्री

कोकणाच्या मदतीला भाजपाची धाव; १४ ट्रक मदतसामुग्री रवाना

June 8, 2020 20:30 IST
Follow Us
  • निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
    1/11

    निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

  • 2/11

    माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ या अभियानांतर्गत 14 ट्रक मदतसामुग्री आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालय, मुंबईहून कोकणात रवाना करण्यात आले आहेत.

  • 3/11

    या संकटकाळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, सुनील राणे, राहुल नार्वेकर आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.

  • 4/11

    या मदतसामुग्रीत अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, कोळसा, सिमेंटचे पत्रे, ताडपत्री, सोलर कंदिल, मेणबत्ती, माचिस आदी सामुग्रीचा समावेश आहे.

  • 5/11

    मुंबई भाजपाच्या वतीने गेली दोन दिवस एक अभियान राबविण्यात आले आणि त्या अभियानातून जनसहभागातून ही मदतसामुग्री गोळा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जी मदत गोळा झाली, ती 14 ट्रक सामुग्री आज रवाना करण्यात आली.

  • 6/11

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि कोकण विभागाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांची एक बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली होती आणि त्यात मदतसामुग्री तातडीने रवाना करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

  • 7/11

    कोकणावर आलेले हे संकट मोठे आहे आणि या संकटात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहील. तातडीच्या स्वरूपात जी काय मदत लागेल, ही त्यांना देण्यासाठी पक्ष काम करेल असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

  • 8/11

    पहिल्या टप्प्यात 14 ट्रक मदतसामुग्री रवाना करण्यात येत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाला तर आहेच. पण, वीजेची आवश्यकता लक्षात घेता सोलर कंदिल आणि निवार्‍याच्या सुविधा लक्षात घेता सिमेंटचे पत्रे आणि ताडपत्री यांचा समावेश यात करण्यात आला आहे. यापुढे सुद्धा हा उपक्रम असाच सुरू राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

  • 9/11

    कोकणासाठी राज्य सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी करताना आपणही मदत करत राज्य सरकारला मदत करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. जितकी जास्तीत जास्त मदत पाठवून सरकारच्या कामाला हातभार लावण्याच्या दृष्टीने मदत करत आहोत असं त्यांनी म्हटलं.

  • 10/11

    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आल्यानंतर आम्ही रोख रक्मक देत मदत केली होती. तात्काळ मदत अत्यंत आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत तोकडी आहे. आढावा घेऊन लवकर इतर मदत जाहीर करणं गरजेचं आहे असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

  • 11/11

    शरद पवार कोकणचा दौरा करणार असून ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना परिस्थितीच गांभीर्य कळेल आणि योग्य त्या सूचना सरकारला करतील अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

Web Title: Nisarga cyclone flagging off relief material trucks by bjp devendra fadanvis sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.