-
पुणे : करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याचं घर निर्जंतुक करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दोन सदस्यीयं पथकं तयार केली आहेत. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
हे पथक दुचाकीवरुन संबंधित ठिकाणी जाऊन ती जागा निर्जंतुक करतात.
-
बिबवेवाडी परिसरात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णाच्या घरावर या पथकाने शुक्रवारी पीपीई किट घालून जंतूनाशकाची फवारणी केली.
-
या विशेष पथकाने संबंधित ठिकाणी पोहोचल्यानंतर काम सुरु करण्यापूर्वी सोबत आणलेले पीपीई किट परिधान केले.
-
त्यानंतर फवाऱ्याद्वारे परिसरातील वाहनं आणि घर त्यांनी निर्जंतुक केलं.
-
पीपीई किट घालून निर्जंतुकीकरणाचं काम सुरु असताना उत्सुकतेपोटी परिसरातील नागरिक त्याचं काम जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते.
-
यावेळी निर्जंतुकरणाची प्रक्रिया सुरु असताना या पथकातील एकाने संबंधित प्रक्रियेचे चित्रीकरणही केले.
-
आपलं सर्व काम आटोपल्यानंतर हे पथक आपल्या दुचाकीवरुन इच्छितस्थळी रवाना झाले.
निवासस्थान निर्जंतुकीकरणासाठी महापालिकेचं विशेष पथक
Web Title: Sanitizing team of pune municipal corporation reached this house in bibwewadi after a covid19 was detected to a resident asy