-
पुणे : करोनाच्या या संकटात आरोग्य कर्मचारी हे आघाडीचे योद्धे आहेत. कारण थेट करोनाच्या विषाणूशीच त्यांचा दररोज सामना होत असतो. या आजाराने अनेक लहानथोरांना भयभीत केले असताना एक २५ वर्षांचा तरुण लॅब टिक्निशिअन मात्र, धैर्याने लढतो आहे. (सर्व छायाचित्रे – पवन खेंगरे)
-
मोहन शंकर चव्हाण असे या तरुण टेक्निशिअनचे नाव असून पुणे महापालिकेच्या नायडू सांसर्गिक रोगांच्या रुग्णालयात त्याची नेमणूक करण्यात आली आहे.
-
आपल्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी तो केंद्रावर दाखल झाल्यानंतर पीपीई किट परिधान करतो. त्यानंतरच त्याच्या कामाला सुरुवात होते.
-
दांडेकर पूल येथील राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक येथे महापालिकेने उभारलेल्या स्वॅब कलेक्टिंग केंद्रावर तो दररोज सुमारे १५० संशयीत करोना रुग्णांच्या स्वॅबचे नमुने गोळा करतो.
-
उस्मानाबद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुम हे त्याचं मूळ गाव आहे. सध्या तो धनकवडी भागातील बालाजीनगर येथे भाड्याने राहतो.
-
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) त्याची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. नायडू रुग्णालयात तो स्वॅबचे नमुने गोळा करण्याचे काम करतो.
-
मोहनने आजवर २५०० जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत.
-
या स्वॅब कलेक्शनच्या कामासाठी मोहनला महिन्याला ७,२०० रुपये पगार मिळतो. हा पगार त्याच्या आवश्यक गरजाही भागवू शकत नाही.
-
मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्याच्या पगारात वाढ करण्यात येईल अशी त्याला आशा आहे.
-
स्वॅब कलेक्शन सेंटरवर जाऊन त्याने आजवर लहान मुलांपासून तरुण आणि वृद्ध व्यक्तींचे स्वॅब प्रत्यक्ष घेतले आहेत.
-
या कामात अनेक अडचणींचा आणि धोक्यांचा सामना करावा लागत असला तरी तो ते काम संपूर्ण समर्पित भावनेने करीत आहे.
-
करोनाच्या या लढ्यात अशा अनेक लहान व्यक्तींची महान काम जनतेसमोर येत नाहीत. मात्र, ती तितकीच महत्वाची असतात.
स्वॅबचे नमुने घेणाऱ्या तंत्रज्ञ तरुणाचा जीवनसंघर्ष!
Web Title: Life struggles of young technologists taking swab samples aau