• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. uses of lemon peels benefits nck

लिंबाचा रस नाही तर सालही आहे तितकचं फायद्याचं; जाणून घ्या लिंबाच्या सालीचे उपयोग

मुंग्याचा त्रास कमी करण्यापासून नखं स्वच्छ करण्यापर्यंत, लिंबाच्या सालीचे सात फायदे

June 19, 2020 13:13 IST
Follow Us
    • पदार्थांची चव वाढवण्यासाठी जेवणात हमखास लिंबाचा वापर होतो. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व तर असतेच त्याशिवाय यातील फायबरचा पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो.
    • लिंबाच्या रसाचा वापर करून झाल्यानंतर अनेकजण त्याच्या साली फेकून देतात. पण सौंदर्य खुलवण्यापासून ते भांड्यांवरचे चिवट डाग घालवण्यापर्यंत अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो.
    • तेव्हा लिंबाच्या सालीचा वापर कशाप्रकारे करता येऊ शकतो हे जाणून घेऊयात.
    • – फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर दोन तीन लिंबाच्या साली ठेवाव्या, फ्रिजेमधी दुर्गंधी लगेच दूर होते.
    • – ढोपर किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याच काळवंडलेली त्वचा उजळते.
    • अनेकदा जेवण्याच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. साबणाने देखील हा चिवटपण जात नाही. एखादा पदार्थ करपला की भांड्याच्या तळाला डाग राहतात अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासली की चिवटपणा लगेच निघून जातो.
    • – कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो अशावेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी, सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही.
    • – चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर येणार काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो.
    • – लिंबांच्या सालीचा वापर करून तुम्ही नखं स्वच्छ करू शकता. लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळीच चमक देखील येते.
    • घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी, मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो.

Web Title: Uses of lemon peels benefits nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.