एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. -
आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आलेल्या रविंद्र शेळके या तरुणाचा संघर्ष पाहणार आहोत…
-
कळंब तालुक्यातील बोर्डा गावच्या रवींद्र शेळके यांनी राज्यात दुसरा येऊन उपजिल्हाधिकारी पदावर शिक्कामोर्तब केला आहे.
-
रवींद्र शेळके यांचे वडील हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. नुकतेच ते त्यातून निवृत्त झाले आहेत.
-
मुलाच्या यशाने वडील भारावून गेले आहेत.
-
प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला एमबीबीएस पदवी प्राप्त करून त्यावर समाधान न मानता रवींद्र यांनी राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि त्यांच्या मेहनतीला यश आले आहे
रवींद्र यांनी आपलं शालेय शिक्षण कळंब शहरातील सावित्रीबाई फुले शाळेत पूर्ण केले तर अकरावी बारावीचे शिक्षण लातूर येथील महाविद्यालयात पूर्ण करून मुंबईतील लोकमान्य टिळक मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथून एमबीबीएसची पदवी घेतली. -
मागील काही कालावधीपासून ते दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते.
-
उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारूनसुद्धा पुढे यूपीएससीची तयारी सुरू ठेऊन त्यात यश मिळवायचे
-
एकूण 420 परीक्षार्थी यांची निवड यादी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्द केली आहे.13 जुलै ते 15 जुलै 2019 रोजी ह्या साठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.
ST कंडक्टरचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी; उस्मानाबादचा रविंद्र MPSC मध्ये राज्यात दुसरा
Web Title: Success story ravindra shelke become deputy collector osmanabad nck