पुणे : गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर गणेश मूर्ती साकारणारे कलाकार आपापल्या कामांना लागले आहेत. (सर्व छायाचित्रे – पवन खेंगरे) -
पुण्यातील राजेंद्र देशमुख यांच्यासह त्यांची टीम कारखान्यामध्ये गणेशाच्या मूर्ती तयार करीत आहेत.
यंदा या उत्सवावर करोनाचं सावट असणार आहे. सार्वजिनिक ठिकाणी गर्दी करण्यास बंदी असल्याने तसेच फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करावयाचे असल्याने यंदा नागरिकांचा सार्वजनिक ऐवजी घऱगुती गणपती बसवण्याकडेच जास्त कल असणार आहे. मुंबई-पुण्यात तर काही प्रसिद्ध गणेश मंडळांनी नेहमीप्रमाणे आपल्या भव्यदिव्य उत्सव रद्द करण्यासह गणेशाच्या छोट्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आधीच जाहीर केले आहे. पावसाळा सुरु झाल्याने या काळात करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचं रुप बदललेलं असेल. पुण्यातील गणेश मूर्ती बनवायच्या कारखान्यांमध्ये यंदा मागणीनुसार मूर्ती साकारण्यात येत आहेत. आपले कौशल्य दाखवत कलाकार या गणेशाच्या मूर्त्या साकारत आहेत. तसेच करोनापासून सुरक्षेसाठी त्यांनी आपल्या तोंडाला मास्कही लावले आहेत. अनेक मूर्ती तर बनवून तयार असून त्यांच्यावर रंगांचा शेवटचा हात देण्याचे काम सुरु आहे.
गणेशोत्सवाची लगबग, करोनाच्या सावटामुळं घरगुती मूर्तींवर भर
यंदा या उत्सवावर असणार करोनाचं सावट
Web Title: Around ganeshotsav demand for domestic idols due to corona outbreak aau