-
चंद्रपूर शहर व जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. (सर्व छायाचित्र – रविंद्र जुनारकर)
-
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली पहायला मिळाली, शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पहायला मिळालं.
-
कस्तुरबा मार्ग, सिटी शाळा, आझाद बाग, जयंत टॉकीज या महत्वाच्या भागांमध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पहायला मिळालं.
-
चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरातही पावसाचं पाणी साचलं, अनेक भागात यामुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.
-
घुघुस भागात वीज पडून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
-
मुसळधार पावसामुळे अनेक भागात झाडं पडल्याचंही समोर आलं आहे.
चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस
Web Title: Chandrapur city receive heavy rainfall water clogging at many areas psd