-
पाकिस्तानच्या कराची शहरातील स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर आज सकाळी मोठा दहशतवादी हल्ला झाला. चार सशस्त्र दहशतवाद्यांनी इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करताना अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये चार सुरक्षा रक्षक आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. (फोटो सौजन्य – एएनआय, रॉयटर्स आणि एपी)
-
प्रत्युत्तरादखल झालेल्या कारवाईत हे चारही दहशतवादी ठार झाले. कराचीमधील स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीमध्ये नेहमीच वर्दळ असते. सात जण या दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले आहेत.
-
सर्व दहशतवादी ठार झाल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान स्टॉक एक्सजेंच्या इमारतीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
-
पाकिस्तानी वृत्तावाहिन्यानी दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी स्टॉक एक्सचेंज इमारतीबाहेर गाडीतून उतरले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य प्रवेशद्वारावर ग्रेनेड फेकून इमारतीत घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला. (फोटो सौजन्य – रॉयटर्स)
-
गोळीबाराचा आवाज ऐकताच इमारतीच्या आतमध्ये असलेल्या लोकांमध्ये एकच घबराट पसरली. त्यांना इमारतीच्या मागच्या गेटवरुन बाहेर काढण्यात आले. ( फोटो सौजन्य – एपी फोटो)
-
पोलीस आणि रेंजर्सनी या भागाला घेराव घातला आहे. प्रवेशद्वारावरच चारही दहशतवाद्यांना संपवण्यात आले. (फोटो सौजन्य – रॉयटर्स)
-
प्रवेशद्वारावरच चारही दहशतवाद्यांना संपवण्यात आले. पोलिसांनी या मृत दहशतवाद्यांकडे असलेले एके-४७ रायफल, हँड ग्रेनेड, मॅगझीन आणि अन्य साहित्य सापडले.
पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्याची बलोच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी
Web Title: Baloch liberation army takes responsibility of pakistan stock exchange attack dmp