-
देशात पेट्रोल-डिझेल दरवाढ सातत्याने सुरू असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. देशभरात विविध ठिकाणी आज काँग्रेसकडून इंधन दरवाढीविरोधात व केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
-
पुण्यातील अलका चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलनास सुरूवात झाली होती.
-
शहर अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची याप्रसंगी मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
-
यावेळी कार्यकर्ते विविध फलक घेऊन सहभागी झाले होते.
-
बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
-
इंधन दर वाढीवरून मोदी सरकारला लक्ष केले गेले.
-
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याचे दिसून आले.
-
अहमदाबाद येथे देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
-
यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आले.
-
आंदोलनात काँग्रेसच्या महिला आघाडीचाही सहभाग दिसला.
-
काही कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले होते, पोलिसांना त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.
-
बंगळुरुमध्ये देखील काँग्रेसने माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.
-
बंगळुरूमध्ये काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे सायकल चालवत आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह रवाना झाले होते
-
पाटणा येथे देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्त्यावर उतरून इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.
-
यावेळी काही कार्यकर्ते घोडागाडीत आंदोलन स्थळी आले होते.
-
तर महिला कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून येत आंदोलनात सहभाग नोंदवला
-
काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी सायकलद्वारे सहभागी होत इंधन दर वाढीचा निषेध नोंदवला.
-
दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने देखील आयपी कॉलेज चौकात इंधन दरवाढी विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली.
-
यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली.
-
अनेकांना बळाचा वापर करून आंदोलन स्थळावरून हटवले गेले.
-
आक्रमक कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
-
मध्यमवर्गीयाचं कंबरडं मोडणारी, पेट्रोल डिझेल दरवाढ झाली असल्याने महागाई वाढणार आहे, अशी टीका गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात केली.
पेट्रोल-डिझेल दर वाढीविरोधात देशभरात काँग्रेस आक्रमक
रस्त्यावर उतरून नोंदवण्यात आला इंधन दरवाढीबरोबरच केंद्र सरकारचा निषेध
Web Title: Congress aggressive across the country against petrol diesel price hike msr