-
देहू नगरीतून आज दुपारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाल्या.
-
या वेळी पादुकां समोर वारकऱ्यांनी टाळ मृदगांच्या गजरात फुगडी खेळली.
-
पादुकांना पंढरपुकडे मार्गस्थ करताना परंपरेनुसार त्या डोक्यावर घेण्यात आल्या होत्या.
-
फुलांनी सजवलेल्या बसमधून पादुका पंढरपुरला नेण्यात येत आहे.
-
या बसमधील पहिल्याच आसनावर पादुका ठेवण्यात आल्या आहेत.
-
बसमध्ये नियमानुसार केवळ २० मानकऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला.
-
पादुका पंढरपुरकडे मार्गस्थ होत असताना भाविकांनी गर्दी केली होती.
-
विठूनामासह तुकोबारायांचा जयघोष करत पादुकांना पंढरपूरकडे रवाना करण्यात आले.
-
पादुका नेणाऱ्या सजलेल्या बस समोर पालखी समजून अनेकांनी फोटो काढले.
-
महिलांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.
-
पुरुषांच्या बरोबरीने महिला वारकऱ्यांनी देखील उत्साह दाखवला.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील यावेळी पादुकांच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.
जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पादुका विठुरायाच्या दर्शनाला पंढरपुरकडे मार्गस्थ
फुलांनी सजलेली ‘लालपरी’ पादुकांसह २० मानकऱ्यांना घेऊन निघाली
Web Title: Jagadguru tukoba rai paduka departed for pandharpur msr 87 kjp