एकीकडे राज्य सरकार मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्याला अनलॉकच्या दिशेने नेत असताना दुसरीकडे काही ठिकाणी मात्र अद्यापही करोनाचा कहर कमी झालेला दिसत नाही. यामुळे तिथे लॉकडाउन जाहीर कऱण्यात आला आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत १० दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. १२ जुलैपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. (संग्रहित) ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत लॉकडाउन जाहीर कऱण्यासोबत नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. लोकांना या नियमांचं पालन करावं लागणार आहे. अन्यथा त्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. (संग्रहित) (संग्रहित छायाचित्र ) परवानगी असलेल्या जीवनावश्यक वस्तु, आरोग्य सेवा आणि या आदेशांतर्गत मान्य कृतींकरिता परवानगी. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) (एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन) व्यावसायिक आस्थापना कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदाम यासह सर्व दुकाने बंद असतील. सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटिकल्स या आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल. डाळ व तांदुळ गिरणी, खाद्य व संबंधित उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींच्या आवश्यक वस्तुंच्या उत्पादनाची युनिट्स चालविण्यास परवानगी असेल. (संग्रहित) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीतकमी कर्मचाऱ्यांसह चालविण्यास परवानगी असेल. तिथे तीन फुट समाजिक अंतर पालन आणि सॅनिटायझरची व्यवस्था करणे आवश्यक असेल. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – विशाल श्रीवास्तव) मद्य विक्रीची दुकाने केवळ घरपोच सेवेस परवानगी असेल. (संग्रहित) जे उद्योग युनिट सुरू आहेत, ते तसेच सुरु राहतील. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – विशाल श्रीवास्तव) लग्न सोहळ्यासाठी ५० व्यक्तींच्या मर्यादित संख्येस मुभा असणार आहे. (संग्रहित) सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व वैकल्पिक शस्त्रक्रिया नियोजित करण्यात याव्यात. (संग्रहित) जीवनावश्यक वस्तूंची दुकानं दूध, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), बेकरी, किराणा दुकाने, भाजीपाला इत्यादी खाद्यपदार्थ दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरु राहतील. दूध विक्रीची दुकानं पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीत सुरु ठेवून विक्री करता येईल. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) -
मेडिकल स्टोअर्स, रुग्णालयं, दवाखाने, गॅस सिलेंडर पुरवठा, उद्ववाहन दुरुस्ती यांच्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो)
अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तुंच्या ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरीता महापालिका क्षेत्रात लॉकडाउन असणार आहे. (संग्रहित) इंटरसिटी, एमएसआरटीसी बस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांची वाहतूक बंद. टॅक्सी, रिक्षा यांची प्रवासी सेवा बंद. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खासगी वाहनांसह) तसेच खासगी ऑपरेटरांकडून कामकाज बंद. बाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवासी वाहनांना परवानगी असेल. (संग्रहित) सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन) बँका, एटीएमस, विमा आणि संबंधित बाबी, प्रिंट आणि इलेक्टॉनिक माध्यमे, आय.टी आणि आयटीईएस, टेलीकॉम, टपाल, इंटरनेट, डाटा सेवा, पुरवठा साखळी, जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक आणि उपलब्धता, कृषी वस्तु, उत्पादने, सर्व वस्तुंची निर्यात आणि आयात. अन्न, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे यासह आवश्यक वस्तुंचे ई-कॉमर्स वितरण, रुग्णालये, फार्मेसि आणि ऑप्टिकल स्टोअर्स, फार्मास्युटिकल्स उत्पादन, त्याचे व्यापारी आणि त्यांची वाहतूक, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, तेल एजन्सी, त्यांची गोदामे, त्यांच्याशी संबंधित वाहतूक आणि केवळ अत्यावश्यक सेवेतील पासधारक, सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा, खासगी आस्थपना, आवश्यक सेवा आणि कोवीडच्या नियंत्रणासाठी साहाय करणाऱ्या सेवा यांना प्रतिबंधातून वगळण्यात आलं आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत संपूर्ण लॉकडाउन जाहीर, पाळावे लागणार ‘हे’ नियम
१२ जुलैपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे
Web Title: Lockdown announced in thane and kalyan dombivli sgy