गुगलमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तरुणानं समोसं विकण्याचा व्यावसाय सुरू केला. चांगल्या पगाराची नोकरी सोडून समोसं विकायला लावणाऱ्या मुनाफ कपाडियाला सुरूवातीला लोकांनी मुर्खात काढंल. पण आता तोच मुनाफ वर्षाकाठी ५० लाख रुपये कमवतो आहे. जिद्दीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या मुनाफची सक्सेस स्टोरी व्यावसाय करण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांना प्रेरणा देऊन जाईल…. अवघ्या तिशीतल्या मुनाफ कपाडियाचे समोसे बॉलिवूड आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रसिद्ध आहेत. मुनाफने एमबीएची पदवी घेतली. त्यानंतर त्याला विदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरीही मिळाली. विदेशात गेल्यानंतर गुगलची नोकरी मिळाली. पण गलेलठ्ठ पगाराची नोकरी करताना मुनाफला वाटलं की तो याहीपेक्षा चांगलं काम करू शकतो. मग काय, त्यानं पुन्हा भारतात यायचा निर्णय घेतला. मुनाफ कपाडियाने त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये लिहिलं आहे, मी अशी व्यक्ती आहे की ज्याने सामोसे विकण्यासाठी गुगलची नोकरी सोडली. मुनाफच्या डोक्यात समोसं विकण्याची आयडिया आली. मुनाफनं द बोहरी किचन नावाने हॉटेल सुरु केलं. -
मुनाफला समोसं विकण्याची आयडिया त्याच्या आईपासून मिळाली. आईला टिव्हीवरील फूड शो पाहण्याची हौस होती. त्यामुळे ती चांगली (कूक) स्वंयपाकी होती.
मुनाफने आपल्या व्यवसायासाठी आईकडून टिप्स घेऊन फूड चेन सुरू केली. मग त्याने द बोहरी किचन या नावानं रेस्टॉरंट उघडलं आणि आईच्या हातचं जेवण सगळ्यांना खाऊ घातलं. सगळ्यांनाच या हॉटेलमधलं खाणं आवडलं. त्यामुळे मुनाफला प्रेरणा मिळाली. मुनाफ कपाडियाचं 'द बोहरी किचन' फक्त मुंबईतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. गेल्या दोन वर्षांत मुनाफचं वार्षिक उत्पन्न ५० लाखांच्या वर आहे. -
सर्वा फोटो Munaf Kapadia यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून घेतले आहेत.
Inspirational Story : गुगलमधील नोकरी सोडून विकले समोसे, आज वर्षाला कमावतो ५० लाख रुपये
जर कोणी गुगलची चांगली नोकरी सोडून सामोसे विकायला सुरुवात केली तर
Web Title: Munaf kapadia success and inspirational story nck