-
१५ जून २०२० च्या रात्री गलवान व्हॅलीत झालेला संघर्ष कुणीही विसरू शकत नाही. सीमेवर झालेल्या वादानंतर चीन-भारत यांच्यातील सैन्य एकमेकांना भिडलं. रात्रीच्या काळोखात झालेल्या या रक्तरंजित संघर्षात भारताच्या २० सुपूत्रांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलं. त्याचबरोबर चीनच्याही काही सैनिकांना यमसदनी पाठवलं. (फोटो सौजन्य : एएनआय)
-
गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. बदल्याची भाषा बोलली जाऊ लागली. त्यानंतर चीन-भारत सीमेवरील तणावही वाढला. मात्र, लष्करी पातळीवरील चर्चा सुरू होती. ती अजूनही आहे.
-
या संघर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३ जुलै रोजी) अचानक देशवासीयांसह चीनलाही धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह, लडाखचा दौरा करून सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला.
-
इतकंच नाही तर गलवान व्हॅलीतील संघर्षात जखमी झालेल्या जवानांचीही भेट घेतली.
-
देशाच्या सीमेच रक्षण करताना भारतीय जवानांनी चिनी सैन्याविरुद्ध दाखवलेल्या शौर्याची पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतली. त्याचबरोबर जवानांचं मनोधैर्य वाढवत त्यांना लढण्यासाठी बळ दिलं.
-
लेहमध्ये आज अचानक जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी उपचार घेत असलेल्या जवानांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
-
"लडाखमधल्या जवानांचं शौर्य हे हिमालयातल्या पर्वतरागांपेक्षा मोठं आहे", अशा भावना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.
-
"आपला देश कोणत्याही जागतिक संकटापुढे झुकलेला नाही, झुकणार नाही. आज मला तुमचा आणि तुमच्या मातांचा अभिमान आहे, ज्यांनी तुमच्यासारख्या शूर वीरांना जन्म दिला", असंही मोदी म्हणाले.
-
"तुम्ही सगळे लवकर बरे व्हा", अशा सदिच्छाही मोदी यांनी यावेळी उपचार घेत असलेल्या जवानांना दिल्या.
-
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सीमेवर निर्माण झालेल्या तणावासंदर्भात लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर सीमेपलीकडून कुरापती करणाऱ्या राष्ट्रांना इशाराही दिला.
शौर्याची दखल अन् लढण्यासाठी दिलं बळ!
“तुम्ही सगळे लवकर बरे व्हा”
Web Title: Photos prime minister narendra modi met soldiers who were injured in galwanvalley clash bmh