• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. tiware dam in ratnagiri was broke situation after year bmh

पाणी जीवन आहे, पण त्यांच्यासाठी मृ्त्यूचं कारण ठरलं

काही संपूर्ण कुटुंबेच नष्ट झाली, तर काही घरातील कर्ते पुरुष मरण पावले

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • कोकणातील मुसळधार पाऊस काही नवा नाही. दरवर्षी पूर येणं वा पूर सदृश्य परिस्थिती ओढवणं हे नित्याचच आहे. पण ३ जुलै २०१९ रोजीच्या पहाटे महाराष्ट्राची झोप उडाली. या घटनेला आता वर्ष पूर्ण झालं आहे. २ जुलै २०१९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्याच रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणातील पाण्यानं विध्वंस घडवून आणला. (फोटो : लोकसत्ता/एएनआय)
    1/10

    कोकणातील मुसळधार पाऊस काही नवा नाही. दरवर्षी पूर येणं वा पूर सदृश्य परिस्थिती ओढवणं हे नित्याचच आहे. पण ३ जुलै २०१९ रोजीच्या पहाटे महाराष्ट्राची झोप उडाली. या घटनेला आता वर्ष पूर्ण झालं आहे. २ जुलै २०१९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्याच रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणातील पाण्यानं विध्वंस घडवून आणला. (फोटो : लोकसत्ता/एएनआय)

  • 2/10

    पाणी हे जीवन आहे, असं म्हणतात. पण, हेच पाणी तिवरे गावातील अनेकांच्या मृत्यूचं कारण बनलं. गेल्या वर्षी २ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हे धरण फुटले.

  • 3/10

    चिपळूणपासून सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तिवरे गावाला त्याचा तडाखा बसला. अवघ्या काही क्षणांमध्ये गावातील घरे आणि माणसे पाण्याच्या लोंढय़ाबरोबर वाहून गेली.

  • 4/10

    या दुर्घटनेत २२ जणांचा बळी गेला. त्यामध्ये काही संपूर्ण कुटुंबेच नष्ट झाली, तर काही घरातील कर्ते पुरुष मरण पावले. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले. पण यातील दमडीही अजून संबंधितांच्या वारसांना मिळालेली नाही.

  • 5/10

    तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दुसऱ्याच दिवशी, ३ जुलै रोजी दुर्घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांचा रोष शमवण्यासाठी चार महिन्यांत घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले होते तेही अजून पूर्ण झाले नाही.

  • 6/10

    घरे नष्ट झालेल्या कुटुंबांकरिता अलोरे येथे पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहे. तेथे जाण्यासाठी ४० जण इच्छुक आहेत तर १४ जणांना गावातच पुनर्वसन हवे आहे. या समस्येवरही अजून समाधानकारक तोडगा निघालेला नाही.

  • 7/10

    मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टने नवीन घरे बांधण्यासाठी ५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या धरणाची दुरुस्ती करण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी ९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पण गावातील लोकांना मातीचे घरं नको आहे. अशा परिस्थितीत एक वर्ष उलटूनही या ठिकाणच्या लोकांचा जीवनगाडा रुळांवर आलेला नाही.

  • 8/10

    सध्या गावातील काही लोक धरणफुटीनंतर उभारलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रावर, तर उर्वरित लोक आपल्या नातेवाईकांकडे विखुरले गेले आहेत. जगण्याची दिशा हरवलेले तिवरेवासी ग्रामस्थ पाहिले की दुर्घटनेनंतर शासनाने पीडितांच्या पुनर्वसनाच्या केलेल्या घोषणा किती पोकळ होत्या, हे दिसून येते.

  • 9/10

    एसआयटीचा अहवालही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे धरण फुटीच्या प्रकरणाची सरकारी पातळीवरील अनास्था दिसून आली. तिवरे धरणाचे बांधकाम २००० साली पूर्ण झाले. २०१७ मध्ये धरणाला गळती लागली. २०१९ मध्ये धरण दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

  • 10/10

    ३० मे धरणाची दुरुस्ती पूर्ण झाली. एक टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेले तिवरे धरण २ जुलैला फुटले. धरणाची योग्य दुरुस्ती न झाल्याने ते धरण फुटले.

Web Title: Tiware dam in ratnagiri was broke situation after year bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.