-
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात काहीसं भीतीचं वातावरण आहे. याच दरम्यान व्हिएतनामची राजधानी असलेल्या हनोईमध्ये जगातलं पहिलं सोन्याचं हॉटेल पर्यटक आणि ग्राहकांसाठी खुलं झालं आहे. २ जुलै म्हणजे गुरुवाही या हॉटेलचं उद्घाटन झालं. ( सर्व फोटो सौजन्य – Reuters)
-
डोल्से हनोई गोल्डन लेक असं या हॉटेलचं नाव असून, या हॉटेलच्या गेटपासून ते कॉफीच्या कपापर्यंत सर्व वस्तू या सोन्याच्या आहेत.
-
२५ मजल्यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ४०० खोल्या असून, या हॉटेलमधील दरवाजे, कप, टेबल, खिडक्या, नळ, वॉशरुम, भांडी अशा सर्वच गोष्टी सोन्याच्या आहेत.
-
हॉटेलच्या लॉबीमधलं फर्निचर व इतत सजावटीच्या सामानातही खास सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
-
सकाळी उठल्यानंतर तुम्ही वॉशरुमला गेलात तर असा राजेशाही थाट तुमच्यासाठी असेल. वॉशरुममधील सर्व गोष्टींमध्ये सोन्याच्या पत्रा वापरला आहे.
-
हॉटेलच्या छतावरही पूल बनवण्यात आले आहेत. इथे आल्यानंतर हनोई शहराचे सुंदर दृष्य दिसते. येथील छपरांच्या भींतीलाही सोन्याचा मुलामा दिलेला आहे.
-
पहिल्याच दिवशी ग्राहकांनी या हॉटेलमध्ये गर्दी केली होती.
-
२००९ मध्ये या हॉटेलच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. होआ बिन आणि विनधम या बिजनेस ग्रूपने या हॉटेलची निर्मिती केली आहे.
-
या हॉटेलमध्ये एका रात्रीचं भाडं हे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १८ ते २० हजार रुपयांच्या घरात आहे.
-
तर प्रेसिडेंशिअल सूटसाठी अंदाजे ४ लाख रुपयांच्या घरात भाडं घेतलं जातं. सध्या स्थानिक पर्यटक आणि ग्राहकांसाठी हे हॉटेल आकर्षणाचा विषय ठरत आहे.
अबब ! जगातलं पहिलं सोन्याचं हॉटेल, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं…
Web Title: A hotel in hanoi promises tourists a golden luxurious experience watch psd