• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. farmers celebrating bendur at velu village near khedshivapur pune asy

”सर्जा-राजा” चा बेंदूर सण उत्साहात साजरा

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा 'बेंदूर' हा सण शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. (सर्व फोटो - पवन खेंगरे)
    1/10

    शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा 'बेंदूर' हा सण शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. (सर्व फोटो – पवन खेंगरे)

  • 2/10

    पुणे जिल्ह्यातील खेडशिवापूरजवळील वेळू गावात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला.

  • 3/10

    शेतकऱ्यांनी आपली सर्जा-राजाची जोडी चांगलीच सजवली होती. बैलांच्या अंगावर रंगरंगोटी करून त्यांच्या शिंगाला फुगे देखील बांधण्यात आली होती.

  • 4/10

    काही शेतकऱ्यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या अंगावर घरातच रहा सुरक्षित रहा असे संदेश देखील लिहिले होते.

  • 5/10

    हा सण साजरा करताना करोना संसर्ग टाळण्यासाठी ग्रामस्थांनी चेहऱ्याला मास्क लावले होते.

  • 6/10

    गळ्यात घुंगरमाळा घातलेले सर्जा-राजा हा सण साजरा करण्यासाठी आपल्या मालकाबरोबर डौलात गावात निघाले होते.

  • 7/10

    वटपौर्णिमा झाल्यानंतर बेंदूर हा सण येतो. या दिवशी बैलांना न्हाऊ माखू घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी करून, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नवैद्य खायला दिला जातो.

  • 8/10

    यंदा करोना महामारीच्या संकटामुळे सर्व सण-उत्सवांवर गदा आल्याचे दिसत आहे. मर्यादेत राहून व सर्व दक्षात घेऊन नागरिकांना सण साजरे करावा लागत आहे.

  • 9/10

    या दिवशी अनेक गावांमध्ये बैलांची वाजतगाजत मिरवणूक देखील काढण्यात येते.

  • 10/10

    बेंदूर व पोळा हे सण साजरा करण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे. मात्र बेंदूर हा सण आषाढ पौर्णिमेस तर पोळा श्रावण अमावस्येला साजरा केला जातो.

Web Title: Farmers celebrating bendur at velu village near khedshivapur pune asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.