-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)
-
उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं. (Photo: CMO Maharashtra)
-
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. (Photo: Subhash Desai Twitter)
-
टाळेबंदीनंतर राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. (Photo: CMO Maharashtra)
-
नुकतंच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. (Photo: CMO Maharashtra)
-
मध्यंतरी करोना आजाराच्या संसर्गामुळे कामगारांचे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब्स हे संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे. (Photo: CMO Maharashtra)
-
यात उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाने काम केलं आहे. (Photo: CMO Maharashtra)
-
रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स संकेतस्थळावर द्यायची आहे. (Photo: CMO Maharashtra)
-
एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. करोनाच्या काळात अत्यल्प वेळेत हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं आहे. (Photo: CMO Maharashtra)
-
रोजगारासाठी १७ अशी क्षेत्र निवडली आहेत ज्यामध्ये संधी मिळू शकते. ज्यामुळे ९५० हून अधिक व्यवसाय करु शकतात. (Photo: CMO Maharashtra)
-
सुभाष देसाई यांनी यावेळी राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक असणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे महाजॉबवर नोंदणीसाठी डोमिसाइल आवश्यक असणार आहे.
मराठी तरुणांसाठी ठाकरे सरकारकडून महत्त्वाचं पाऊल, महाजॉब्स पोर्टलचं उद्घाटन
ठाकरे सरकारकडून महाजॉब्स पोर्टलचं उद्घाटन
Web Title: Mahajobs portal launched by maharashtra cm uddhav thackeray sgy 87