-
नवी मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात लॉकडाउन घेतला आहे. अशातच दररोज पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी लावणीकडे वळाला आहे.
-
पनवेलमध्ये विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा कमालीचा सुखावला आहे.
-
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५ जूननंतर बरसणारा पाऊस आधीच बरसल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाच्या कामांना सुरुवात केली आहे.
-
पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
-
पावसाने दिलासादायक सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
-
पावसाने हजेरी लावल्याने त्यांनीही तातडीने भात लावणीच्या कामांना सुरुवात केल्याने शेतावर शेतकरी आणि शेतमजूर यांची एकच लगबग सुरू असल्याचे दिसून येते.
-
एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी आधीच उरकून घेतल्याने पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे.
-
शेतांमध्ये भात पिकाची लावणी करण्याच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र आहे.
-
शेतीत शेतकऱ्यांनी घेतलेली आधुनिकतेची कास व पुरेसा पाऊस यामुळे जिल्ह्यतील भातपिकाचे उत्पादन वाढणार आहे.
-
लावणी पद्धतीने भाताची लागवड करण्यात येत आहे.
आमची माती आमची माणसं… पावसानंतर भात लावणीला सुरुवात
Web Title: Farmers start transplanting paddy following a respite in the monsoon rain near panvel sdn