-
करोनाने थैमान घातलं असताना सध्या सर्वांचंच लक्ष लस निर्मितीकडे लागलं आहे.
एकीकडे ऑक्सफर्डची करोनावरील लस यशस्वी ठरत असून नोव्हेंबरपर्यंत ती बाजारात येईल असं सांगितलं जात असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ञांनी मात्र २०२१ च्या आधी तिचा वापर होईल अशी अपेक्षाच करु नका असं सांगितलं आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे. (Photo: Reuters) -
जागतिक आरोग्य संघटना योग्य लस वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. (Photo: Reuters)
-
यादरम्यान जगभरात करोना रुग्णांची संख्या रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत असताना करोनाचा संसर्ग रोखणं खूप महत्त्वाचं आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन यांनी सांगितलं आहे. (Photo Courtesy: Reuters)
-
आपण चांगली प्रगती करत असल्याचं सांगताना रायन यांनी अनेक लस तिसऱ्या टप्प्यात असून आतापर्यंत सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने कोणालाही अपयश आलेलं नाही अशी माहिती दिली.
-
पण लस तयार झाली तर लोकांनी ती मिळण्यासाठी आपल्याला २०२१ ची वाट पहावी लागणार असल्याचं रायन यांनी सांगितलं आहे. (Photo: AP)
-
जागतिक आरोग्य संघटना योग्य लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करत असून यासोबतच त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी याकडे लक्ष ठेवून असल्याचं रायन यांनी सांगितलं आहे.
-
"हे जगाच्या भल्यासाठी असल्याने आपल्याला प्रामाणिक असलं पाहिजे. करोनावरील लस ही फक्त श्रीमंत किंवा गरीबांसाठी नसून प्रत्येकासाठी असणार आहे," असं रायन यांनी म्हटलं आहे. (Photo: Reuters)
-
रायन यांनी यावेळी जोपर्यंत करोना समूह संसर्ग नियंत्रणात येत नाही शाळा सुरु करण्यासंबंधी काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं आहे.
-
"मुलांना सुरक्षितपणे शाळेत पुन्हा आणण्यासाठी आपल्याला शक्य ते सर्व केलं पाहिजे. करोनाला रोखणं हाच त्यावरील सर्वात प्रभावी मार्ग आहे. कारण जर तुम्ही करोनावर नियंत्रण मिळवलं तर तुम्ही शाळा सुरु करु शकता," असं रायन यांनी म्हटलं आहे.
“…ती अपेक्षाच करु नका”, लस निर्मितीकडे लक्ष लागलं असतानाच WHO कडून मोठं विधान
लस निर्मितीकडे लक्ष लागलं असतानाच जागतिक आरोग्य संघटनेचं मोठं विधान
Web Title: Coronavirus who expert mike ryan says dont expect first vaccinations until early 2021 sgy