• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. friendship day these movies on friendship changed the mood of the youth aau

Friendship Day: मैत्रीवरील ‘या’ सिनेमांनी बदलला तरुणाईचा मूड

August 2, 2020 18:28 IST
Follow Us
  • रॉक ऑन (२००८) - हा सिनेमा चार मित्रांची कथा आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष कथन करतो. गैरसमजुतीतून झालेल्या अनेक चुकांनंतरही जेव्हा त्यांची मैत्री काळाच्या कसोटीवर टिकून राहते त्यानंतर ती अधिक दृढ होते. (सर्व छायाचित्रं सौजन्य - गुगल))
    1/

    रॉक ऑन (२००८) – हा सिनेमा चार मित्रांची कथा आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष कथन करतो. गैरसमजुतीतून झालेल्या अनेक चुकांनंतरही जेव्हा त्यांची मैत्री काळाच्या कसोटीवर टिकून राहते त्यानंतर ती अधिक दृढ होते. (सर्व छायाचित्रं सौजन्य – गुगल))

  • 2/

    दिल चाहता है (२००१) – या सिनेमातील आकाश, समीर आणि सिद्धार्थ या मित्रांप्रमाणे जीवाभावाचे मित्र आपल्या मित्र मंडळींमध्येही असतातच. नवा जमाना, नवे विचार, नवी स्टाईल असं सर्व या सिनेमातून प्रेक्षकांपुढं आलं आणि प्रेक्षकांनीही ते मनापासून स्विकारलं.

  • 3/

    कुछ कुछ होता है (१९९८) – 'प्यार दोस्ती है' हे विधान विस्तृतपणे सांगण्याचं काम या सिनेमानं केलं होतं. या सिनेमानचं खऱ्या अर्थानं भारतात 'फ्रेंडशिप डे' रुजवला त्याचबरोबर तो साजरा करण्याच्या कल्पना आणि फ्रेंडशिप बँडनं तरुणांच्या मनात घर केलं.

  • 4/

    दोस्ती (१९६४) – बॉलिवडूमधील हा सिनेमा दोन खऱ्या मित्रांवर आधारित असलेला मागच्या पिढीतला सिनेमा आहे. रामू आणि मोहन या दोन मित्रांची ही कथा आहे. हे दोघेही एकमेकांना आपल्या सक्षम बाजूंद्वारे मदत करीत असतात. 'गरजेच्यावेळी धाऊन येतो तोच खरा मित्र' या वाक्प्रचाराचा प्रत्यय या सिनेमातून येतो.

  • 5/

    आनंद (१९७१) – या सिनेमानं जगण्याचं नवं बळ अनेकांना दिलं. पेशन्ट आणि डॉक्टरमधील मैत्री यातून वेगळ्या भावनिक ढंगामध्ये समोर आली होती. यातील कॅन्सरचा पेन्शट असलेल्या आनंदने (राजेश खन्ना) आपल्या डॉक्टर मित्राला (अमिताभ बच्चन) जीवनाचं खरं सार शिकवलं होतं.

  • 6/

    थ्री इडियट्स (२००९) – ही कथा रँचो नावाच्या एका कॉलेज तरुणाची कथा आहे. शिक्षण घेत असताना त्याच्या जीवनात आलेल्या राजू आणि फऱहान या दोन मित्रांसोबतचा त्याचा अविस्मरणीय प्रवास यात आहे. प्रचलित शिक्षण पद्धतींवर कोरडे ओढणारा हा सिनेमा असून कॉलेज जीवनातील अभ्यासाचा ताण, घरच्या अपेक्षा आणि स्वतःचं स्थानं निर्माण करण्याची धडपड तरुणांना प्रेरणा देऊन गेली होती.

  • 7/

    रंग दे बसंती (२००६) – पाच मित्रांची ही कथा असून दिग्दर्शकानं स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुण आणि सध्याचा काळातील तरुण यांच्या विचारांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्याआधीचा भारत आणि नंतरचा भारत त्याची बदललेली परिमाणं आणि इथल्या तरुणाईतील ऊर्जा आणि साम्य सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं यातून केला. जो अधूनमधून हसवत-रडवत आपल्याला अंतर्मुख करुन टाकतो.

  • 8/

    ये जवानी है दिवानी (२०१३) – कबीर नावाच्या एका तरुणाची ही कथा असून त्याचे मित्र आदिती, अवी आणि नैना यांच्या मैत्रीचा याला तडका आहे. मित्रांशिवाय आणि मैत्रीच्या खऱ्या आनंदाशिवाय सर्वजण कसे एकटे आहेत हे या सिनेमातून पहायला मिळतं.

  • 9/

    कल हो ना हो (२००३) – हा सिनेमा एक प्रेमाचा त्रिकोण आहे. यामध्ये अमन, नैना आणि समीर या तीन मित्रांची कथा आहे. या तिघांमध्ये निर्माण झालेली खरी मैत्री एकमेकांच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार असते, हे यातून पहायला मिळतं.

  • 10/

    काय पो चे (२०१३) – राजकारणापेक्षा मैत्री ही आपल्या जीवनात मोठी शक्ती आहे, हा धडा हा सिनेमा आपल्याला देतो.

  • 11/

    जिंदगी ना मिलेगी दोबारा (२०११) – तीन मित्र त्यांच्या बॅचलर पार्टीसाठी एकत्र येतात आणि त्यानंतर त्यांच जीवनचं कायमचं बदलून जातं. अर्जुन, इम्रान आणि कबीर हे आपल्याला नेहमीच आपल्या मित्रांची आठवण करुन देतात. त्यामुळे आपण वारंवार हा सिनेमा पाहतो.

TOPICS
फ्रेंडशिप डे २०२४Friendship Day 2024

Web Title: Friendship day these movies on friendship changed the mood of the youth aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.