• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pm narendra modi ayodhya ram temple foundation stone laying ceremony speech sgy

राम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज ते मुस्लीमबहुल देश; मोदींच्या भाषणातील १२ महत्त्वाचे मुद्दे

भूमिपूजनानंतर नरेंद्र मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं

August 5, 2020 16:22 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अखेर अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सरसंघचालक मोहन भागवत कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. जाणून घेऊयात त्यांच्या भाषणातील १२ महत्त्वाचे मुद्दे (सर्व फोटो - भाजपा ट्विटर)
    1/

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अखेर अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सरसंघचालक मोहन भागवत कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. जाणून घेऊयात त्यांच्या भाषणातील १२ महत्त्वाचे मुद्दे (सर्व फोटो – भाजपा ट्विटर)

  • 2/

    – पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे.

  • 3/

    – राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आजचा दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचं प्रतिक आहे.

  • 4/

    – भूमिपूजनाचं आमंत्रण का स्वीकारलं हे सांगताना पंतप्रधान मोदींनी रामकार्य केल्याशिवाय मला आराम मिळत नाही अशी भावना व्यक्त केली.

  • 5/

    – हे राम मंदिर राष्ट्रीय भावनेचं तसंच संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल. याशिवाय कोटी लोकांच्या सामूहिक संकल्पतेचं प्रतिक असेल. येणाऱ्या पिढीसाठी हे मंदिर आस्थेचं प्रतिक असेल. राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळत राहील.

  • 6/

    – राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात समर्पण, त्याग, संघर्ष, संकल्प होता. ज्याच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे स्वप्न साकार होत आहे, त्या सगळ्यांना मी नमन करतो, वंदन करतो.

  • 7/

    – आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक आहे. कित्येक दशकांची प्रतिक्षा आज संपत आहे. करोडो लोकांना आज आपण हा क्षण जिवंतपणी पाहू शकत आहोत यावर विश्वासच बसत नसेल.

  • 8/

    – ज्याप्रमाणे मावळे छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याचे संरक्षक बनले, तसंच देशातील अनेक लोकांच्या सहयोगाने राममंदिर निर्माणाचं हे पुण्यकार्य पूर्ण झालं.

  • 9/

    – अनेक देशातील लोक प्रभू श्रीरामाला मानतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असेल्या इंडोनेशियात रामायण पूज्यनीय आहे. कंबोडिया, मलेशिया, थायलंड, इराण आणि चीनमध्ये राम कथांची माहिती मिळेल. नेपाळ आणि श्रीलंकेचाही संबंध जोडलेला आहे. अनेक देशांमधील लोकांना राम मंदिराचं काम सुरू झाल्याबद्दल आनंद होत असेल.

  • 10/

    – करोनाच्या संकटकाळात मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मर्यादा आल्या आहेत. प्रभू श्रीरामाच्या कामात जी मर्यादा अपेक्षित असते त्या मर्यादेचं दर्शन या कार्यक्रमात दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही ही मर्यादा देशामध्ये दिसली

  • 11/

    – प्रभू श्रीरामाचं मंदिर म्हणजे एकजुटीचं प्रतिक आहे. भारताची अध्यात्मिकता आणि एकजुटता हा जगासाठी प्रेरणेचा आणि अभ्यासाचा विषय आहे.

  • 12/

    – जेव्हा जेव्हा माणुसकीने प्रभू रामचंद्रांना मान्य केलं आहे तेव्हा विकास झाला आहे. जेव्हा आपण भटकलो आहोत तेव्हा विनाश झाला. आपल्याला सर्वांच्या भावनांची काळजी घ्यायची आहे. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन, विश्वास घेऊन विकास करायचा आहे,

  • 13/

    – प्रभू श्रीरामांचा संदेश संपूर्ण जागापर्यंत कसा निरंतर पोहोचेल हे आपल्या वर्तमान आणि भावी पिढ्यांची जबाबदारी आहे.

TOPICS
राम जन्मभूमीRam Janmabhoomiराम मंदिरRam Mandir

Web Title: Pm narendra modi ayodhya ram temple foundation stone laying ceremony speech sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.