मुंबईतील बीडीडी चाळीत वाढलेल्या IAS प्राजक्ता लवंगारे यांची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहे. परिस्थितीवर मात करुन त्या आयएएस झाल्या… त्यांच्या यशाची ही कथा…. बीडीडी चाळीत डासांचा उच्छाद… अशा परिस्थितीत लवंगारे यांच्या कुटुंबीयाकडे मच्छरदाणीही घ्यायला पैसे नव्हते… पण आई-वडिलांचं कष्ट आणि चार बहिणीची जिद्दीपुढे सर्व काही शुल्लक ठरलं…. प्राजक्ता लवंगारे आणि त्यांच्या तिन्ही बहिणीचं उच्च शिक्षण झालं आहे. वडील मुंबई महानगर पालिकेत एक कर्मचारी तर आई एका खाजगी रुग्णालयात नर्सचं काम करत होते. सर्वसामान्य कुटुंब… पण आई-वडिलांची इच्छा होती मुलींनी मोठ्या हुद्यावर जावं… मुलींनीही जिद्द धरली… प्राजक्ता लवंगारे यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परिक्षा पास केली. आणि IAS अधिकारी होत वडिलांचं स्वप्न साकार केलं. तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर अशा परीक्षा देऊन प्राजक्ता थांबल्या असत्या पण यूपीएससी ही देशातली सर्वात कठीण परीक्षा तू क्रॅक करू शकतेस, असा आत्मविश्वास वडिलांनी दिला… एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेल्या प्राजक्ता यांनी परिस्थितीशी संघर्ष करीत टाटा सामाजिक संस्थेतून उच्च शिक्षण घेतले . २००१ साली upsc मध्ये यश मिळवलेल्या प्राजक्ता यांना मुलाखतीत ३०० पैकी २६८ गुण मिळाले होते. महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून प्राजक्ता लवंगारे सध्या काम पाहत आहेत. ज्याच्या प्रशासनात कार्यतत्पर, सेवानिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून प्राजक्ता लवंगारे यांची ओळख आहे. प्राजक्ता यांनी सेवेत आल्यापासून वैजापूर , अहमदनगर, धुळे, मुंबई , नवी दिल्ली , सिडको आणि नवी मुंबई येथे आपल्या कार्यातून त्यांनी वेगळेपणा जपला आहे. राज्याच्या महसुलात मोठा वाटा असणाऱ्या उत्पादन शुल्क विभागात राज्याच्या आयुक्त म्हणून ही प्राजक्ता लवंगारे यांनी काम पाहिले आहे. … (छायाचित्र सौजन्य – @iasprajaktalavangare)
आई नर्स, वडील BMC मध्ये कर्मचारी; मुलीनं IAS होऊन दाखवलं
Web Title: Inspirational success stories success story ias officer prajakta lavangare nck