• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rhea chakravarti ssr case ncb officer sameer wankhede nck

रियाच्या घरावर धाड टाकणाऱ्या NCB अधिकाऱ्याचे मराठी कनेक्शन ठाऊक आहे का?

September 8, 2020 16:47 IST
Follow Us
  • अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली आज अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागानं ही कारवाई केली. या तपासात शुक्रवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक झाली आहे. या दोघांना बेड्या ठोकणारे अधिकारी आहेत समीर वानखेडे.
    1/

    अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली आज अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागानं ही कारवाई केली. या तपासात शुक्रवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक झाली आहे. या दोघांना बेड्या ठोकणारे अधिकारी आहेत समीर वानखेडे.

  • खास गोष्ट म्हणजे समीर वानखेडे हे मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे (Kranti Redkar) पती आहेत.
  • 2/

    २०१७ मध्ये क्रांती आणि समीर यांचे लग्न झाले. या दाम्पत्याला जुळ्या मुली आहेत.

  • 3/

    समीर वानखेडे आय आर एस म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे ऑफिसर आहेत. यापूर्वीही समीर यांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी धाडी टाकल्या आहेत.

  • विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा यासारख्या दिग्गज सेलिब्रेंटींच्या घरावर समीर वानखेडे यांनी धाडी टाकल्या आहेत.
  • 4/

    २०१३ साली बेकायदेशीर पद्धतीने परदेशी चलन बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध गायक मिका सिंग याला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. ही कारवाईही समीर यांनीच केली होती.

  • 5/

    समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत.

  • 6/

    त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई विमानतळावर डिप्टी कस्टम कमिश्नर म्हणून झाली झाली होती.

  • 7/

    कस्टममधून त्यांची बदली नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनबीसी)मध्ये करण्यात आली आहे. मागील दोन वर्षात समीर वानखेडे यांनी १७ हजार कोटींचं ड्रग्ज पकडलं आहे.

  • 8/

    आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भातील खुलासा समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपासही समीर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Web Title: Rhea chakravarti ssr case ncb officer sameer wankhede nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.