-

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. आधी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामुळे वारंवार त्यांचं नाव मीडियामध्ये चर्चेत होतं. तर नुकतीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी आपण सध्या तरी असा कोणता निर्णय घेतला नसल्याचं सांगत आहेत. गुप्तेश्वर पांडे यांची आयपीएस होण्याची इच्छा नव्हती. जाणून घेऊयात मग नेमकं त्यांनी पोलीस खात्यात येण्याचा निर्णय का घेतला…(All Photos: Facebook)
-
१९८७ त्या बॅचचे आयपीएस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म बिहारमधील बक्सर जिल्ह्यात झाला.
-
आयपीएस होण्याआधी गुप्तेश्वर पांडे यांची निवड आयआरएएससाठी झाली होती.
-
मुलाखतींमध्ये गुप्तेश्वर पांडे यांनी अनेकदा आयपीएस होणं आपलं स्वप्न नव्हतं असं सांगितलं आहे. पण एका घटनेमुळे त्यांनी व्हायचं तर आयपीएस असा निर्धार केला.
-
गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं होतं की, जेव्हा ते १० वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या घरात चोरी झाली होती. तपासासाठी आलेल्या पोलिसांनी आपल्या आई-वडिलांना योग्य वागणूक दिली नव्हती. त्यांनी फक्त गैरवर्तन केलं नाही तर चोरीचा तक्रारही दाखल करुन घेतली नव्हती.
-
त्या घटनेमुळे गुप्तेश्वर पांडे यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले…पोलीस इतके वाईट असतात का ? असा प्रश्न त्यांना पडला. यानंतर त्यांनी पोलीस व्यवस्था सुधारण्याचा निर्धार केला आणि आयपीएस अधिकारी व्हायचं असं मनाशी पक्क केलं.
-
शेवटी मेहनतीच्या जोरावर गुप्तेश्वर पांडे आयपीएस अधिकारी झाले.
-
ते फक्त आयपीएस अधिकारी झाले नाही तर पोलीस महासंचालक पदापर्यंत पोहोचले.
-
एकदा पुरावा शोधण्यासाठी गुप्तेश्वर पांडे यांनी नदीत उडी मारली होती.
-
गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून त्यांचा अर्ज राज्यपालांनी स्वीकारला आहे. गुप्तेश्वर पांडे आपण राजकारणात येणार नाही असं सांगत असले तरी येणाऱ्या वेळेत याचं उत्तर मिळेल.
“व्हायचं तर आयपीएस, त्यापेक्षा कमी नाही”, आई-वडिलांसोबत झालेल्या ‘त्या’ अन्यायामुळे गुप्तेश्वर पांडेंनी केला निर्धार
१९८७ त्या बॅचचे आयपीएस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म बिहारमधील बक्सर जिल्ह्यात झाला
Web Title: Bihar former dgp gupteshwar pandey jounery to ips officer sgy