Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. coronavirus lockdown week long lockdown in nagpur huge crowd seen at dadar market in mumbai bmh

महाराष्ट्रातील दोन शहरांतील विरोधी दृश्य! एकीकडे गर्दी-दुसरीकडे शुकशुकाट

दोन शहरांतील भिन्न परिस्थिती

Updated: September 9, 2021 00:32 IST
Follow Us
  • राज्यातील काही शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात रविवारी १६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे दिवसेंदिवस सरकारची झोप उडत चाललेली असताना मुंबईतील दादरच्या रस्त्यांवर झालेली गर्दी. (छायाचित्रं :एएनआय)
    1/8

    राज्यातील काही शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात रविवारी १६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे दिवसेंदिवस सरकारची झोप उडत चाललेली असताना मुंबईतील दादरच्या रस्त्यांवर झालेली गर्दी. (छायाचित्रं :एएनआय)

  • 2/8

    सरकारकडून सातत्यानं नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं जात आहे. सध्याच्या परिस्थितीत तरी करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण व निर्बंधांचे पालन करणे हाच उपाय आहे, असं वैज्ञानिकांकडून सांगितलं जात आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचंच या दृश्यातून दिसत आहे.

  • 3/8

    मुंबईतील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असताना वर्दळीचा भाग असलेल्या दादरमधील ही गर्दी चिंतेत भर घालणारी ठरू शकते.

  • 4/8

    मुंबईत रविवारी १,९६२ रुग्ण आढळून आले. वाढत चालेल्या रुग्णसंख्येचा नागरिकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचं दिसून येत आहे.

  • 5/8

    मुंबईपेक्षाही नागपूरमध्ये करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात सात दिवसांत करोनाचे रुग्ण ११,७९२ रुग्ण आढळून आले. या रुग्णसंख्येमुळे नागपूरमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी मुख्य रस्त्यांवर असा शुकशुकाट होता.

  • 6/8

    नागपूरमध्ये एका आठवड्याचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि गर्दी यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

  • 7/8

    गेल्या सात दिवसांत विदर्भातील नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ६४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात जिल्ह््याच्या बाहेरून नागपुरातील विविध रुग्णालयांत दगावलेल्या काही रुग्णांचाही समावेश आहे.

  • 8/8

    आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार विदर्भात ७ ते १३ मार्च २०२१ या कालावधीत करोनाचे २६ हजार ५७१ नवीन रुग्ण आढळले. त्यातील ४४.३७ टक्के हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. (छायाचित्रं :एएनआय)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus lockdown week long lockdown in nagpur huge crowd seen at dadar market in mumbai bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.