Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. raj thackeray press confernce raj thacekeray uddhav thackeray meeting bmh

बँकांचे हप्ते, विद्यार्थ्यांच्या परीक्षा ते शेतकऱ्यांना मदत; राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?

Updated: September 9, 2021 00:29 IST
Follow Us
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (५ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्याचबरोबर काही सूचनाही सरकारला केल्या. राज यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या सूचना पुढील प्रमाणे... (सर्व छायाचित्रं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ट्विटर हॅण्डल)
    1/10

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (५ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्याचबरोबर काही सूचनाही सरकारला केल्या. राज यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या सूचना पुढील प्रमाणे… (सर्व छायाचित्रं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ट्विटर हॅण्डल)

  • 2/10

    छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवावं पण त्याची विक्री होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल, तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी.

  • 3/10

    लॉकडाऊनच्या काळात वीजबिलं माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही. ऑफ़िस बंद आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिलं कशी भरायची?

  • 4/10

    बँकाकडून थकीत कर्जाच्या बाबतीत कर्जदारांकडे जो तगादा सुरु आहे, त्यामुळे कर्जदार त्रस्त आहेत कारण मुळात उद्योग बंद आहेत. नोकऱ्या गेल्या आहेत. अशा वेळेस जो तगादा सुरु आहे तो थांबायला हवा. या सक्तीच्या वसुलीसंदर्भात बँकांशी सरकारनं चर्चा करायला हवी.

  • 5/10

    शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा. १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना यावर्षी उत्तीर्ण केलं पाहिजे.

  • 6/10

    या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा.

  • 7/10

    खेळाडूंना सरावासाठी सरकारनं परवानगी द्यायला हवी आणि जिमसारख्या जागा जिथे गर्दी न होऊ देता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी.

  • 8/10

    अनेक खासगी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून, देखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत.

  • 9/10

    कंत्राटी कामगारांना काढायचं पुन्हा करोना वाढला की घ्यायचं यापेक्षा सरकारनं महापालिकांमध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यायला हवं.

  • 10/10

    हॉस्पिटल्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी, आम्ही हॉस्पिटल्सना जबाबदारीची जाणीव करून देऊ शकतो पण आमची जाणीव करून देण्याची पद्धत वेगळी आहे पण ही ती वेळ नाही.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Raj thackeray press confernce raj thacekeray uddhav thackeray meeting bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.