-
पुणे महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेमध्ये आज नगरसेवकांनीच करोनासंदर्भातील नियम मोडल्याचं चित्र पहायला मिळालं.
-
करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणे शहराचे नियम शिथिल करण्यात आले. मात्र मागील अनेक महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेची सर्व साधारण सभा ऑनलाईन घेतली जात होती.
-
पुणे शहराचे नियम शिथिल झाल्याने, सभागृह चालविण्यास परवानगी शासनाकडून मिळाली आहे.
-
आज पुणे माहानगरपालिकेची सर्व साधारण सभा घेण्यात आली.
-
मात्र या सभेमध्ये अनेक नगरसेवकांनी मास्क न घालता बसले होते.
-
इतकच नाही तर या सभेमध्ये नगरसेवकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन केलं नसल्याचंही दिसून आलं.
-
काही नगरसेवक तोंडावरील मास्क काढून आरामात बसलेले,
-
काही महिला नगरसेवक सोशल डिस्टन्सिंग विसरुन अशाप्रकारे एकमेकांशी गप्पा मारत होत्या.
-
अनेक नगरसेवक सोशल डिस्टन्सिंग विसरुन अगदी एकमेकांना खेटून बसलेले.
-
अनेकांनी मास्कच घातले नव्हते. त्यामुळे पुणेकरांकडून करोना नियमांचे पालन करण्याची अपेक्षा कऱणाऱ्या नगरसेवकांनी कृतीतून आदर्श घालून देण्याची गरज असल्याची चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं.
पुणे : नगरसेवकांनीच मोडले करोना नियम; सोशल डिस्टन्सिंग विसरुन महिलांच्या गप्पा तर पुरुषांना मास्कचा विसर
मागील अनेक महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेची सर्व साधारण सभा ऑनलाईन घेतली जात होती, आज बऱ्याच महिन्यांनी प्रत्यक्षात सभा पार पडली ज्यात नियमांचे उल्लंघन झालं
Web Title: Pune news covid 19 rules violation by pune municipal corporation corporators svk 88 scsg