-
करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून उपनगरी रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
-
त्यासाठी आज, बुधवारपासून मुंबई महानगर प्रदेशातील विविध रेल्वे स्थानकांतून केवळ मासिक पास दिले जाणार असून, त्यासाठी १०९ रेल्वे स्थानकांत आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.
-
रेल्वेतून प्रवास करताना पास, ओळखपत्र तसेच लसीकरण प्रमाणपत्र प्रवाशांना बाळगावे लागणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.
-
लसीकरण झालेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती.
-
त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंगळवारी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या.
-
ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केल्यावर मिळणारे 'युनिव्हर्सल क्युआरकोड' ओळखपत्र असलेल्यांना मात्र लसीकरण प्रमाणपत्र बाळगण्याची आवश्यकता नाही.
-
लशीच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्यात आली असली तरी केवळ मासिक पास काढणाऱ्यांनाच ही सुविधा मिळणार आहे.
-
दैनंदिन तिकीटासाठी ही सुविधा मिळणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले.
-
त्यासाठी बुधवारपासून लसीकरण पूर्ण झाल्याची पडताळणी करण्यात येणार असून प्रवाशांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र (आधार कार्ड) रेल्वे स्थानकातील मदत कक्षातील कर्मचाऱ्यांकडून तपासून घ्यावीत.
-
मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर ५३ स्थानकांत तर संपूर्ण महानगर प्रदेशात १०९ स्थानकांत मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत ही सुविधा मिळणार आहे.
-
ऑनलाइन सुविधा विलंबाने : प्रवाशांच्या सोईसाठी ऑनलाइन ओळखपत्र देण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. (सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यानुसार प्रवाशांना अॅप आणि संकेतस्थळ सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
-
त्यावरून आवश्यक दस्तावेजांच्या माध्यमातून युनिव्हर्सल ओळखपत्र दिले जाणार असून अन्य ओळखपत्राप्रमाणे याचा उपयोग करून रेल्वे पास काढता येईल.
-
ऑनलाइन पद्धतीने पास काढणाऱ्यांना प्रवासात केवळ पास आणि युनिव्हर्सल ओळखपत्र बाळगावे लागेल.
-
ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. (सर्व फोटो : दिक्षा पाटील / लोकसत्ता)
मुंबई लोकलसाठी पास मिळण्यास सुरुवात; तुम्ही पात्र आहात का? कोणती कागदपत्रं हवीत?
Web Title: Mumbai local commuters at thane station who got railway pass after verification of covid 19 vaccine certificate documents information photos sdn