• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. telangana village pochampally selected as one of best tourism villages by un hrc

Photo : जागतिक पर्यटन संघटनेकडून ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज’चा पुरस्कार मिळवणारं भारतातलं गाव आहे तरी कसं?

पाहा जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून निवडलेल्या भारतातील या गावाचे फोटो…

Updated: November 16, 2021 18:28 IST
Follow Us
  • तेलंगणातील पोचमपल्ली गावाची मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने (UNWTO) सर्वोत्तम पर्यटन गावांपैकी एक म्हणून निवड केली आहे. (फोटो - एएनआय)
    1/15

    तेलंगणातील पोचमपल्ली गावाची मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने (UNWTO) सर्वोत्तम पर्यटन गावांपैकी एक म्हणून निवड केली आहे. (फोटो – एएनआय)

  • 2/15

    स्पेनमधील माद्रिद येथे २ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जाईल.

  • 3/15


    केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी गावातील लोकांचे अभिनंदन केले आहे

  • 4/15

    ते म्हणाले, “पोचमपल्लीच्या अनोख्या विणकामाच्या शैली आणि नमुन्यांवर पंतप्रधान मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या मंत्राद्वारे आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून विशेष लक्ष केंद्रित केले गेले.

  • 5/15

    “विशेषत: पोचमपल्लीच्या लोकांच्या आणि तेलंगणातील लोकांच्या वतीने, पोचमपल्ली गावाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

  • 6/15

    पोचमपल्ली आणि इतर गावांची नावं प्रभावीपणे मांडल्याबद्दल मी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचाही आभारी आहे,” असंही  रेड्डी म्हणाले.

  • 7/15

    UNWTO च्या उपक्रमाद्वारे ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन गावां’चा उद्देश ग्रामीण स्थळांची उत्कृष्ट उदाहरणे असलेल्या गावांना पुरस्कार देणे हा आहे.

  • 8/15

    प्रशिक्षण आणि सुधारणांच्या संधींद्वारे त्यांच्या ग्रामीण पर्यटन क्षमता वाढवण्यासाठी गावांना पाठिंबा देण्याचे देखील हे देखील यामागचं उद्दिष्ट आहे.

  • 9/15

    पर्यटन मंत्रालयाने भारतातील UNWTO सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम प्रवेशासाठी तीन गावांची शिफारस केली होती.

  • 10/15

    त्यामध्ये मेघालयातील कोंगथोंग, मध्य प्रदेशातील लाधपुरा खास आणि तेलंगणातील पोचमपल्ली या गावांचा समावेश होता.

  • 11/15

    त्यापैकी पोचमपल्ली गावाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. 

  • 12/15

    पोचमपल्ली हे गाव हैदराबादपासून ५० किमी अंतरावर असून तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात आहे.

  • 13/15

    पोचमपल्ली हे गाव इक्कतच्या सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

  • 14/15

    या गावाला ‘भारताची सिल्क सिटी’ म्हणून संबोधले जाते.

  • 15/15

    पोचमपल्ली इक्कतला २००२ मध्ये सरकारकडून भौगोलिक निर्देशक (GI) मानांकन देखील प्राप्त झाले आहे.

Web Title: Telangana village pochampally selected as one of best tourism villages by un hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.