• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos captured clearest and detailed picture of sun claims astro photographer andrew mccarthy hrc

Photos: तब्बल दीड लाख फोटो काढून ‘या’ ॲस्ट्रोफोटोग्राफरने तयार केला सूर्याचा आतापर्यंतचा सर्वात स्पष्ट फोटो

पाहा अमेरिकन ॲस्ट्रोफोटोग्राफर अँड्र्यू मॅककार्थी यांनी काढलेले सूर्याचे सर्वात स्पष्ट फोटो..

Updated: December 8, 2021 14:36 IST
Follow Us
  • अमेरिकन ॲस्ट्रोफोटोग्राफर (खगोल छायाचित्रकार) अँड्र्यू मॅककार्थी यांनी सूर्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
    1/11

    अमेरिकन ॲस्ट्रोफोटोग्राफर (खगोल छायाचित्रकार) अँड्र्यू मॅककार्थी यांनी सूर्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 2/11

    हे फोटो त्यांनी आतापर्यंत सूर्याचे जेवढे फोटो काढले आहेत, त्यापैकी सर्वात तपशीलवार आणि स्पष्ट फोटो असल्याचा दावा मॅककार्थी यांनी केला आहे.

  • 3/11

    अँड्र्यूने सूर्यमालेतील सर्वात मोठ्या ताऱ्याचे हे चित्र तयार करण्यासाठी दीड लाखांहून अधिक वेगवेगळी छायाचित्रे वापरली आहेत.

  • 4/11

    त्यांनी हे सर्व फोटो एका अनोख्या फोटोग्राफी पद्धतीने काढले आहेत. त्यापैकी शेवटचा फोटो हा तब्बल ३०० मेगापिक्सेल आकाराचा आहे.

  • 5/11

    मॅककार्थी यांनी काढलेले सर्व फोटो ३०० मेगापिक्सेलच्या शेवटच्या चित्रात पाहता येऊ शकतात. हा फोटोसामान्य १० मेगापिक्सेल कॅमेऱ्याच्या फोटोपेक्षा ३० पट मोठा आहे.

  • 6/11

    फोटोच्या क्लोजअप व्ह्यूमध्ये गूढ गडद सनस्पॉट अगदी जवळून पाहता येतो.

  • 7/11

    यापूर्वी सूर्याची फक्त निवडक छायाचित्रे अशी आहेत, ज्यामध्ये त्याच्या पृष्ठभागावर गडद डाग आणि आगीच्या ज्वाला दिसत आहेत.

  • 8/11

    सूर्याच्या पृष्ठभागावर दिसणारे हे काळे डाग प्रत्यक्षात काळे नसतात. या ठिकाणांहून बाहेर पडणारे अतिशय शक्तिशाली किरण, फोटोग्राफिक प्रक्रियेमुळे काळे दिसतात.

  • 9/11

    सूर्याचे असे चित्र काढण्याची प्रक्रिया खूप कठीण असते. छायाचित्रकाराला सूर्याच्या तीव्र किरणांमुळे आंधळे होण्यापासून वाचवण्यासाठी दोन फिल्टर असलेली विशेष दुर्बीण वापरावी लागते.

  • 10/11

    डेली मेलशी बोलताना अँड्र्यू म्हणाले, “मी सूर्याचे फोटो काढण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. हे काम नेहमी आधीपेक्षा वेगळे असल्याने खरोखरच मनोरंजक आहे. चंद्राचा फोटो काढताना आकाश किती निरभ्र आहे यावर चंद्राचे चित्र अवलंबून असते.

  • 11/11

    पण सूर्याचे फोटो काढणं कधीही कंटाळवाणं नसतं. आणि अखेर त्या दिवशी मला सूर्याचे एक अतिशय स्पष्ट चित्र मिळाले. (सर्व फोटो अँड्र्यू मॅककार्थी यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Web Title: Photos captured clearest and detailed picture of sun claims astro photographer andrew mccarthy hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.