• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. home minister amit shah performed dagdusheth halwai ganpati pujan msr 87 svk

PHOTOS : गृहमंत्री अमित शहा यांनी केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा

गणरायाच्या अभिषेक व पुजनानंतर मंगल आरती देखील करण्यात आली.

Updated: August 23, 2022 12:51 IST
Follow Us
  • गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या राज्याच्या दौर्‍यावर असून आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले. 
    1/18

    गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या राज्याच्या दौर्‍यावर असून आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले. 

  • 2/18

    याप्रसंगी त्यांच्या हस्ते महाभिषेक आणि आरती करण्यात आली.

  • 3/18

    गणरायाच्या मुर्तीला मंत्रोच्चरांच्या घोषात अमित शहा यांनी अभिषेक केला.

  • 4/18

    यावेळी अमित शहा यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश करोनामुक्त होवो, आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो अशी प्रार्थना केली. 

  • 5/18

    याचबरोबर अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो, यासोबतच सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील त्यांनी प्रार्थना केली. 

  • 6/18

    सहकार मंत्री झाल्यापासून अमित शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.

  • 7/18

    पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत, त्यामुळे भाजपासाठी अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

  • 8/18

    आज दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने शहा यांच्या दौऱ्याची सुरूवात झाली. 

  • 9/18

    सगळ्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होवो, अशी प्रार्थना करत गणरायला अभिषेक करण्यात आला.

  • 10/18

    अमित शहा यांच्या हस्ते गणरायाची विधीवत पूजा करण्यात आली

  • 11/18

    याप्रसंगी अथर्वशीर्षाचे आवर्तनही करण्यात आले आणि गणपतीचे अंगपूजनही करण्यात आले.

  • 12/18

    पूजनाच्या वेळी अमित शहा हे देखील काही मंत्रोच्चार करत होते, अशी माहिती देखील पुजाऱ्यांनी दिली.

  • 13/18

    गणरायाच्या विधीवत अभिषेक व पुजनानंतर मंगल आरती करण्यात आली.

  • 14/18

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला.

  • 15/18

    यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

  • 16/18

    आज सायंकाळी अमित शहा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणार आहेत.

  • 17/18

    याशिवाय, अमित शहा हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

  • 18/18

    केंद्रीय गृहमंत्री गणरायाच्या दर्शनाला येणार असल्याने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात होता.

Web Title: Home minister amit shah performed dagdusheth halwai ganpati pujan msr 87 svk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.