• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. maharashtra ministers and leaders who are covid positive vsk

PHOTOS: राज्यातले ‘हे’ मंत्री आणि प्रमुख नेते करोनाच्या कचाट्यात

January 4, 2022 15:17 IST
Follow Us
  • राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमी होत असलेली रुग्णसंख्या अचानक वाढू लागली आहे. दिवसाला १० -१२ हजार नवे करोनाबाधित आढळून येऊ लागल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. अशातच राज्यातले मंत्री आणि अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. गेल्या काही दिवसात करोनाची लागण झालेले महाराष्ट्रातले नेते कोणते? जाणून घ्या..
    1/12

    राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमी होत असलेली रुग्णसंख्या अचानक वाढू लागली आहे. दिवसाला १० -१२ हजार नवे करोनाबाधित आढळून येऊ लागल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. अशातच राज्यातले मंत्री आणि अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. गेल्या काही दिवसात करोनाची लागण झालेले महाराष्ट्रातले नेते कोणते? जाणून घ्या..

  • 2/12

    राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आजच करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्वीट करत याबद्दल सांगितलं आहे. याआधीही त्यांना करोनाची लागण झाली होती.

  • 3/12

    राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटी करोनाची लागण झाली. त्याही सध्या विलगीकरणात आहेत.

  • 4/12

    राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा करोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

  • 5/12

    राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेही सध्या करोनाबाधित आहेत.

  • 6/12

    राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पतीही करोनाबाधित आहेत.

  • 7/12

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनाही करोनाची लागण झाली आहे.

  • 8/12

    भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनाही करोनाची लागण झाली असून त्यांना करोनाचा नवा विषाणूप्रकार ओमायक्रॉनची लागण झाली आहे. पहिल्या लाटेतही त्यांना करोना संसर्ग झाला होता.

  • 9/12

    भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही करोना झाला आहे.

  • 10/12

    भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनाही करोनाची लागण झाली आहे.

  • 11/12

    भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचं लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नानंतर त्यांनाही करोनाची लागण झाली. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी अंकिता पाटील ही देखील करोनाबाधित आहे.

  • 12/12

    भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

Web Title: Maharashtra ministers and leaders who are covid positive vsk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.