• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. wardha accident bjp mla vijay rahangdale son among 7 killed as car falls off bridge pm narendra modi expresses grief sgy

PHOTOS: मित्राचा वाढदिवस, सेलिब्रेशन आणि अपघात…; वर्ध्यात सात मित्र जागीच ठार; संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, मोदींनीही व्यक्त केला शोक

मृतांमध्ये तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कारचाही समावेश आहे

January 25, 2022 14:40 IST
Follow Us
  • वर्ध्यात एक भीषण अपघात झाला असून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
    1/16

    वर्ध्यात एक भीषण अपघात झाला असून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

  • 2/16

    वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा येथे रात्री १२.३० त्या सुमारास झालेल्या कार अपघातात सात तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • 3/16

    सावंगी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातले हे सर्वजण एमबीबीएसचं शिक्षण घेत होते.

  • 4/16

    मृतांमध्ये तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कारचाही समावेश आहे.

  • 5/16

    हे सर्वजण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते अशी प्राथमिक माहिती आहे. सेलिब्रेशन केल्यानंतर परतत असताना हा अपघात झाल.

  • 6/16

    दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून ४० फूट खाली कोसळली. त्यात गाडीतील सर्व गतप्राण झाले. मृत्यू झालेले सर्व तरुण २५ ते ३५ वयोगटातील आहेत.

  • 7/16

    अपघात इतका भीषण होता की गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्याने सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली.

  • 8/16

    अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलीस निरीक्षकही घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे.

  • 9/16

    पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

  • 10/16

    अपघातानंतर अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.

  • 11/16

    पोलिसांच्या मदतीला तेथील स्थानिकांनी धाव घेतली होती.

  • 12/16

    उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या माहितीनुसार, रात्री १२.३० च्या सुमारास सावंगी पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली. यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावर कुठेही अपघातग्रस्त वाहन दिसून आलं नाही. मात्र जेव्हा त्यांनी पुलाच्या खाली पाहिलं तेव्हा अपघातग्रस्त वाहन दिसलं. खाली जाऊन पाहणी केली असता सात जणांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटली नव्हती. स्थानिक पाटील आणि गावकऱ्यांच्या मदतीने गाडी दूर केली आणि मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.

  • 13/16

    प्राथमिक निष्कर्षानुसार वळण घेताना चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असा अंदाज आहे.

  • 14/16

    निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहे. यापैकी अविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा होता.

  • 15/16

    वर्ध्याचे खासदार रामदास तडसदेखील घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनीहा दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.

  • 16/16

    या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना तसंच जखमींना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्वीट करत मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सेलसुराजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Web Title: Wardha accident bjp mla vijay rahangdale son among 7 killed as car falls off bridge pm narendra modi expresses grief sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.