• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. nationalist congress partys agitation in pune against bandatatya karadkar msr

PHOTOS : वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी बंडातात्यांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांच्याविरोधात पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल केला आहे.

Updated: February 4, 2022 18:55 IST
Follow Us
  • बंडातात्या कराडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेत पुण्यात आंदोलन केले.
    1/10

    बंडातात्या कराडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेत पुण्यात आंदोलन केले.

  • 2/10

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

  • 3/10

    तर यावेळी बंडा तात्या कराडकर यांच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले.

  • 4/10

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा देखील या आंदोलनात मोठा सहभाग होता.

  • 5/10

    बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

  • 6/10

    त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलनं केली जात आहे.

  • 7/10

    पुण्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने किर्तनामध्ये गातात त्याप्रमाणे अभंगातील ओव्या गाऊन बंडातात्यांविरोधात आंदोलन केलं.

  • 8/10

    “ज्ञानोबा तुकाराम… बंड्याचं डोकं ठिकाणावर आण…”, “बंड्यातात्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय…” अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंड्यातात्यांविरोधात आंदोलन केलं.

  • 9/10

    “वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्या बंड्यातात्याचा धिक्कार असो”, अशी घोषणाबाजीही यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.

  • 10/10

    पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांच्याविरोधात पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल केला आहे. 

Web Title: Nationalist congress partys agitation in pune against bandatatya karadkar msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.