Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ins vagsheer the kalvari class submarines last submarine launched asj

Photos : आयएनएस वागशीर (INS Vagsheer) पाणबुडीचे शानदार कार्यक्रमात जलावतरण, लवकरच चाचण्यांना सुरुवात

मुंबईतील माझगांव डॉकयार्डमध्ये संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या हस्ते जलावतरण झाले

Updated: April 20, 2022 19:54 IST
Follow Us
  • वागशीर ही स्कॉर्पिन वर्गातील सहावी आणि अखेरची पाणबुडी आहे. प्रकल्प-७५ अंतर्गत एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात आली. (फोटो - प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
    1/9

    वागशीर ही स्कॉर्पिन वर्गातील सहावी आणि अखेरची पाणबुडी आहे. प्रकल्प-७५ अंतर्गत एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात आली. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    स्कॉर्पिन वर्गाला देशात कलवरी वर्गातील पाणबुड्या या नावाने ओळखले जातात. कलवरी, खंदेरी, करंज, वेला या पाणबुड्या नौदलात दाखल, वागीरच्या समुद्री चाचण्या सुरु आहेत. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    आयएनएस वागशीरचे जलावतरण झाले असून लवकरच समुद्रातील चाचण्यांना सुरुवात होणार आहे. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    सुमारे १७०० टन वजनाच्या कलवरी वर्गातील पाणबुड्या या सलग ५० दिवस समुद्रात कार्यरत राहू शकतात. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    एक दमात १२ हजार किलोमीटर अंतर पार करण्याची या पाणबुड्यांची क्षमता असून अत्याधुनिक  Exocet क्षेपणास्त्र आणि पाणतीरांनी ( torpedo) ही पाणबुडी सज्ज आहे.

  • 6/9

    कलवरी वर्गातील पाणबुड्या या डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर चालतात आणि जगात सर्वोत्कृष्ठ म्हणून ओळखल्या जातात.

  • 7/9

    पाणबुडीच्या तंत्रज्ञान हस्तांतरणात उशीर झाल्याने पाणबुड्या बांधण्याचा कार्यक्रमाला चार वर्षे उशीर झाला हे विशेष.

  • 8/9

    कलवरी वर्गातील सहावी आणि अखेरची पाणबुडी बांधण्याचे काम माझगाव डॉकयार्डने पुर्ण केले आहे.

  • 9/9

    भारताला आणखी पाणबुड्यांची आवश्यकता असून आता आणखी कोणत्या प्रकारच्या पाणबुड्या बांधण्याबाबत निर्णय घेतला जातो याकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

TOPICS
पाणबुडीमाझगाव डॉकMazagon Dock

Web Title: Ins vagsheer the kalvari class submarines last submarine launched asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.