-
भारतात डिजिटल पेमेंटशी संबंधित फसवणूक वाढत आहे. UPI भारतातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट व्यासपीठ आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, एप्रिल आणि सप्टेंबर २०२१ मध्ये भारतातील बँकांनी एकूण ४,०७१ फसवणुकीची प्रकरणे नोंदवली आहेत. नोंदवलेल्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये एकूण रक्कम ३६,३४२ कोटी रुपये होती.
-
UPI युजर्सनी आयडी आणि पिन कधीही कोणाशीही शेअर करू नये. जरी कोणी बँक प्रतिनिधी असल्याचा दावा करत असला तरीही. बँक प्रतिनिधी UPI आयडी आणि UPI पिन सारखे तपशील विचारत नाहीत याची नोंद घ्या. पेमेंटमध्ये समस्या येत असली, तरीही असे तपशील शेअर करू नका.
-
फसवणूक करणारे काही जण युपीआय अॅपवर पॉपअप किंवा पेमेंटसाठी विनंती करणारे मॅसेज पाठवतात. असे मॅसेज ओपन करू नका.
-
अनोळखी ईमेल लिंकही ओपन करू नका. यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.
-
बँक खाते युजर्संनी नेहमी Google Play Store किंवा Apple App Store वर उपलब्ध असलेले सत्यापित UPI अॅप्स वापरावेत.
-
फसवणूक होऊ नये यासाठी UPI वापरकर्त्यांनी नेहमी त्यांचा UPI पिन अपडेट करावा.
Fraud Alert: UPI द्वारे पेमेंट करताना ‘या’ पाच बाबी लक्षात ठेवा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, एप्रिल आणि सप्टेंबर २०२१ मध्ये भारतातील बँकांनी एकूण ४,०७१ फसवणुकीची प्रकरणे नोंदवली आहेत.
Web Title: Five things to keep in mind when making payments through upi rmt