सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथे वेगाने सुरु आहे.
1/10
प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांदे सागरी सेतूपर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे.
प्रकल्पाचे आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या वर्षभरात ९० टक्के काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल.
2/10
या मार्गातर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचे दोन बोगदे दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहेत.
पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी पालिका अर्थसंकल्पात तब्बल ३२०० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली असून एकूण तरतुदीच्या तब्बल १४ टक्के तरतूद ही सागरी किनारा मार्गासाठी करण्यात आली आहे.
3/10
गेल्यावर्षी या प्रकल्पासाठी ३५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
4/10
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचा मूळ खर्च ८४२९.४४ कोटी असून सर्व करांसह १२,९५० कोटी इतका आहे.
5/10
आतापर्यंत या प्रकल्पासाठी साडेचार हजार कोटी खर्च झाले आहेत.
6/10
येत्या वर्षांत प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.