-
पुण्यातील एसएसपीएम संस्थेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या समोर शिवस्वराज्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उभारण्यात आली. (सर्व फोटो – सागर कासार)
-
या कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केले होते.
-
पुढील वर्षांपासून शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात उभारली जाईल आणि प्रत्येक वर्षी एका गडावर विद्यार्थ्यांसह हा शासनातर्फे सोहळा साजरा केला जाईल. यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी केली.
-
सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीसमोर दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे असावे यासाठी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयात देखील हा दिन साजरा करण्याला मान्यता दिली आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति आदराची भावना व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयात शिवशक राजदंड स्वराज्य ध्वज लावल्यास महाराजांच्या कार्याची प्रेरणा महाविद्यातील विद्यार्थ्यांना मिळेल, असं यावेळी उदय सामंत म्हणाले.
-
अमित गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला किरण साळी, सौजन्य निकम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
-
जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय…असा जय घोष यावेळ करण्यात आला.
-
यावेळी कार्यक्रमस्थळी ढोल पथकाने उत्तम सादरीकरण केले. या ढोलपथकात तरुणींचा देखील सहभाग होता.
PHOTOS : शिवस्वराज्य दिना निमित्त उदय सामंतांनी पुण्यात उभारली ५१ फुटी ‘शिवशक राजदंड स्वराज्यगुढी’
प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात ‘शिवशक राजदंड स्वराज्यगुढी’ उभारली जाणार असल्याचेही सांगितले.
Web Title: Photos on the occasion of shivswarajya day uday samant erected 51 feet shivshak rajdand swarajyagudi in pune svk 88 msr