-

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे भारतातील समुद्र उसळले आहेत. अनेक ठिकाणी उंचच उंच लाटा येत असून वाऱ्याचा वेगही वाढला आहे. केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये बिपरजॉय चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे विझिंजम बंदरावर मासेमारी नौका किनाऱ्यावर लावण्यात आल्या. (पीटीआय फोटो)
-
अरबी समुद्रातील भरतीमुळे मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे उंचच उंच लाटा उसळत होत्या. येथे कोस्टल रोडचे काम सुरू असल्याने येथे कामगारही दिसत आहेत. (एपी फोटो)
-
मुंबईतील गिरगाव समुद्रकिनारी धूळ आणि वाळू सर्वत्र पसरली आहे. यामुळे येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळला आहे. (एपी फोटो)
-
मुंबईचे सर्वच समुद्र आज भरतीच्या लाटांनी उसळलेले दिसत आहेत. त्यामुळे समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (पीटीआय फोटो)
-
बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यांच्या कठड्यांवर पाणी आले आहे. परिणामी किनाऱ्या असलेले स्टॉल्स पाण्याखाली गेले आहेत. (पीटीआय फोटो)
Photo : धूळ, वाळुचे लोट आणि उंच लाटा; बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईचा समुद्र खवळला
हवामान खात्याने १५ जूनला भूकंपाचाही अंदाज वर्तवला आहे. सौराष्ट्र आणि कच्छ या भागांसाठी आधीच अलर्ट जारी करण्यात आला आहे. कर्नाटकातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Web Title: Cyclone biparjoy rolls menacingly sea turns rough in india see pics fehd import sgk