-
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीय. बुलढाण्यात अपघात होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही तोवर समृद्धीवर आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. (सर्व फोटो – लोकसत्ता टीम)
-
शहापूर सरलांबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम जोरात सुरू होतं. रात्रकालीन कामादरम्यान ही दुर्घटना घडली आहे.
-
गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला.
-
आतापर्यंत १६ मृतदेह शहापूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
-
अंधार असल्याने गर्डर आणि मशीनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांची निश्चित संख्या किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही.
-
सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे मजुरांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय.
-
NDRF च्या दोन टीम घटनास्थळी पोहचल्या असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी मंत्री दादा भूसे यांनी घटनास्थळी पोहचत आढावा घेतला असून दुर्घटनेची चौकशी केली जाणार असल्याच स्पष्ट केलं आहे.
-
बरोबर महिन्याभरापूर्वी बुलढाण्यात समृद्धी महामार्गवर भीषण अपघात झाला होता. प्रवासी बसने पेट घेतल्याने २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
शंभर फुटांवरून क्रेन मजुरांवर कोसळली अन्…, अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात झाला आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आले आहेत.
Web Title: Photo bloodshed again on samriddhi highway crane falls on laborers from a hundred feet sgk