मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करता येईल असे उद्दिष्ट्य ठेवलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होत आहे. समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेची समाजमाध्यमात चांगलीच चर्चाही रंगली.Read More
मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाकडून समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या रॅम्पवर पाणी आलेले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक एक ते दीड तास प्रवाश्यांच्या…
राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याच्या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने तातडीने दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीचे…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता स्थानिकांची तूर्त नाराजी दूर करण्याकरिता कोल्हापूरकरांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर तसेच चाळीसगाव ते कन्नड दरम्यानच्या वाहतुकीला अधिक गतीमान व सुलभ करण्याच्या दृष्टीने नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खूद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील शेवटचा इगतपुरी-आमणे टप्पा गुरुवारी वाहतुकीसाठी खुला झाला असून आता संपूर्ण महामार्गावर प्रवास सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी…