• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. israel palestine conflict hamas gaza 8973391 iehd import sgk

५०० हून अधिकांचा मृत्यू, इमारती जमिनदोस्त, मशिदी उद्ध्वस्त; इस्रायलमधील विध्वंसांचे PHOTO आले समोर

पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी संघटनेनं शनिवारी सकाळी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आहे. हमासकडून एकाच वेळी पाच हजार रॉकेट सोडल्याने इस्रायलमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.

Updated: October 8, 2023 16:46 IST
Follow Us
  • gaza attack
    1/8

    शनिवारी सकाळी गाझा पट्टीवर हमास दहशतवाद्यांकडून भीषण हल्ला करण्यात आला. तसंच, हमासने चहुबाजने गोळीबार करत अनेक नागरिकांचे प्राण घेतले. पाच हजार रॅकेट सोडून इस्रायलमध्ये दहशत निर्माण केली. यामुळे शेकडो नागरिक गतप्राण झाले असून हजारो नागरिक जखमी झाले आहेत. (एपी फोटो)

  • 2/8

    नियोजित पद्धतीने आधी अडीच ते पाच हजार छोटी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि त्यानंतर जमीन, समुद्रमार्गे हमासचे सैनिक इस्रायलमध्ये शिरले. बेसावध असलेल्या इस्रायलमध्ये अक्षरश: मृत्यूचे तांडव करून शेकडो इस्रायली नागरिक आणि सैनिकांचे अपहरण करण्यात आले. अधिकृत माहितीनुसार, किमान २०० इस्रायली आणि इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात २५० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. हमासच्या या कृतीमुळे आखातामध्ये मोठे युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(रॉयटर्स)

  • 3/8

    खान युनिस येथील मशिदीवरही हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या मशिदीचे पॅलेस्टिनच्या नागरिकांकडून निरिक्षण केले जात आहे. (फोटो – रॉयटर्स)

  • 4/8

    इस्रायलची आयर्न डोम क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा गाझा पट्टीतून प्रक्षेपित केलेल्या रॉकेटला रोखू शकते. दक्षिण इस्रायलमधील अश्केलॉनमधील हे दृष्य आहेत. रॉकेट हवेतल्या हवेत नष्ट करण्याच्या इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला आयर्न डोम असे म्हटले जाते. इस्रायलच्या शेजारी असलेल्या गाझा पट्टी आणि पॅलेस्टाईनकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर २०११ साली आयर्न डोमची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.(रॉयटर्स)

  • 5/8

    पॅलेस्टिनी गाझा शहरातील इस्त्रायली हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या वतन टॉवरच्या अवशेषांची पाहणी करत आहेत. (रॉयटर्स)

  • 6/8

    गाझामधून इस्रायलच्या दिशेनेही रॉकेट डागले गेले . (एपी)

  • 7/8

    दोन्हींकडून झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत ५६३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, इस्रायलच्या अनेक नागरिकांना कैदी करण्यात आल्याचा दावा पॅलेस्टाईनकडून करण्यात येतोय. (एपी फोटो)

  • 8/8

    गाझा पट्टी, खान युनिस येथे इस्रायली हवाई हल्ल्यात नष्ट झालेल्या मशिदीबाहेर लोक उभे आहेत. पॅलेस्टिनी प्राधिकरणाने रविवारी परराष्ट्र मंत्री स्तरावर अरब लीगची आपत्कालीन बैठक बोलावणार असल्याचे सांगितले आहे. (एपी फोटो)

TOPICS
इस्रायलIsraelपॅलेस्टाईनPalestineमराठी बातम्याMarathi News

Web Title: Israel palestine conflict hamas gaza 8973391 iehd import sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.