-
बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ कामाख्या जंक्शनकडे जाणाऱ्या १२५०६ नॉर्थईस्ट एक्स्प्रेसचे सहा डबे रुळांवरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले आहेत. (एपी फोटो)
-
बक्सर पोलिसांनी सांगितले की, ही घटना रात्री ९.५० च्या सुमारास घडली. १२५०६ नॉर्थईस्ट एक्स्प्रेसने बक्सर स्टेशन सोडले आणि बक्सरपासून सुमारे ४० किमी आणि पाटणापासून १६० किमी अंतरावर असलेल्या रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ होती.
-
अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभाग, बक्सर प्रशासन आणि स्थानिक लोक अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. (पीटीआय फोटो)
-
या अपघातात ट्रेनचे सर्व डबे आणि इंजिन रुळावरून घसरले आणि तीन एसी डबे बाजूला झाले. दोन एसी कंपार्टमेंटचे नुकसान झाले असून त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. (एपी फोटो)
-
बुधवारी अंधारामुळे बचाव कार्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. (पीटीआय फोटो)
-
भारतीय रेल्वेने गुरुवारी दिल्ली-कामाख्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. (संतोष सिंग)
-
रेल्वेच्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की बुधवारी रात्री ९.४० च्या सुमारास ट्रेन १२८ किमी प्रतितास वेगाने धावत असताना इंजिन चालकाला आपत्कालीन ब्रेक लावावा लागला. (पीटीआय फोटो)
-
३३ जणांना भोजपूर, बक्सर आणि पाटणा येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. रघुनाथपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रातून ३८ प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. (संतोष सिंग)
-
गुरुवारी पहाटे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आणि पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बीरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत दिली जाणार आहे. (संतोष सिंग)
ट्रेन १२८ किमी प्रतितास वेगाने धावत होती अन्…, बिहार दुर्घटनेतील PHOTO आले समोर
अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभाग, बक्सर प्रशासन आणि स्थानिक लोक अपघाताच्या ठिकाणी पोहोचले.
Web Title: Bihar train accident buxar railways derail 8979343 iehd import