• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. same sex marriage verdict this country allows same sex marriage sgk

Same-Sex Marriage : ‘या’ देशांमध्ये आहे समलिंगी विवाहाला परवानगी

Supreme Court Same-Sex Marriage Verdict : भारतात समलिंगी विवाहावरून आता चर्चा सुरू असताना समलिंगी विवाहाला जगातील ३२ देशांनी याआधीच मान्यता दिलेली आहे

Updated: October 17, 2023 17:25 IST
Follow Us
  • समलिंगी विवाहाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रदीर्घ काळानंतर त्यांचा निर्णय दिला आहे. समलिंगी विवाहांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली नाही. आमच्या अधिकार क्षेत्रात हे येत नाही म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
    1/11

    समलिंगी विवाहाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रदीर्घ काळानंतर त्यांचा निर्णय दिला आहे. समलिंगी विवाहांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली नाही. आमच्या अधिकार क्षेत्रात हे येत नाही म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

  • 2/11

    भारतात समलिंगी विवाहावरून आता चर्चा सुरू असताना समलिंगी विवाहाला जगातील ३२ देशांनी याआधीच मान्यता दिलेली आहे. त्यापैकी १० देशांच्या न्यायालयांनी अशा विवाहाला मान्यता दिली आहे, तर उर्वरित २२ देशांनी कायद्याद्वारे त्यास परवानगी दिली आहे.

  • 3/11

    युनायटेड स्टेट्स – यूएसच्या सर्वोच्च न्यायालयाने २६ जून २०१५ साली ‘ओबरगेफेल विरुद्ध. हॉज’ या खटल्यामध्ये पाच विरुद्ध चार अशा मताने समलिंगी जोडप्यांच्या विवाहाचा कायदा बनविण्याची परवानगी दिली. यूअसच्या सर्व ५० राज्यांमध्ये अशा विवाहास कायद्याने परवानगी मिळाली आहे. न्यायालयाने सांगितले की, फक्त विषमलिंगी जोडप्यांपर्यत विवाह मर्यादित ठेवल्यामुळे समान अधिकाराची हमी देणाऱ्या घटनेतील कलम १४ च्या दुरुस्तीचे उल्लंघन होत आहे. तसेच ३२ राज्यांनी याआधीच गे जोडप्यांच्या विवाहाला परवानगी दिलेली आहे. २००३ मध्ये, समलिंगी विवाहाचा कायदा करणारे मॅसेच्युसेट्स हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले होते.

  • 4/11

    तैवान – २०१९ मध्ये समलिंगी विवाहाला मान्यता देणारा तैवान हा आशिया खंडातला पहिला देश बनला होता. १७ मे २०१९ रोजी न्यायालयाच्या निर्देशानंतर तैवानच्या संसदेने यासंबंधी कायदा मंजूर केला. २०१७ साली तैवानच्या घटनात्मक न्यायालयाच्या निर्णयानंतर स्त्री आणि पुरुष यांच्या विवाह या पारंपरिक व्याख्येमध्ये बदल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. विधिमंडळाला याबाबतचा कायदा करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी देण्यात आला.

  • 5/11

    कोस्टा रिका – उत्तर अमेरिकेमधील समलिंगी विवाहाला मान्यता देणारा कोस्टा रिका हा पहिला देश बनला. २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला असंवैधानिक म्हणत सरकारने घातलेली बंदी उठवली आणि यासंबंधी कायदा करण्याचे निर्देश दिले. २६ मे २०२० रोजी कोस्टा रिकाने समलिंगी विवाहाला मान्यता देणारा कायदा बनविला.

  • 6/11

    दक्षिण आफ्रिका – दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेही सांगितले की, त्यांच्या देशाच्या लग्नाच्या कायद्याने घटनेने दिलेल्या समान अधिकारांच्या हमीचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे संसदेने ३० नोव्हेंबर २००६ रोजी समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता दिली. मात्र या कायद्यावर टीका झाल्यानंतर धार्मिक संस्था आणि संस्थेच्या अधिकाऱ्यांना असे लग्न होण्यापासून बचाव करण्याचेही स्वातंत्र्य देण्यात आले.

  • 7/11

    ऑस्ट्रिया – ऑस्ट्रियाच्या घटनात्मक कोर्टाने २०१७ साली विवाह समानता भेदभावपूर्ण असल्याचे सांगत समलिंगी लग्न कायदेशीर ठरविले. १ जानेवारी २०१९ पासून समलिंगी विवाहाला मान्यता मिळाली.

  • 8/11

    ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, स्वित्झर्लंड – ऑस्ट्रेलियामध्ये २०१७ साली सार्वमत चाचणी घेतल्यानंतर संसदेने समलिंगी लग्नाला मान्यता देणारा कायदा मंजूर केला. या जनमत चाचणीमध्ये ६२ टक्के लोकांनी कायद्याच्या बाजूने मतदान केले. आयर्लंड आणि स्वित्झर्लंडमध्येही अशीच चाचणी पार पडली, ज्यामध्ये LGBTQ समुदायाच्या लग्नाला औपचारिक मान्यता देण्यात आली.

  • 9/11

    अर्जेंटिना – लॅटिन अमेरिकेतील अशा प्रकारचा कायदा करणारा अर्जेंटिना हा पहिला देश ठरला. १५ जुलै २०१० रोजी समलिंगी लग्नाला परवानगी दिल्यानंतर अर्जेंटिना जगातील दहावा देश ठरला. राष्ट्रीय कायदा मंजूर होण्यापूर्वी काही शहरांमध्ये आणि स्थानिक स्वराज संस्थांनी गे जोडप्यांना अशाप्रकारची मुभा दिली होती.

  • 10/11

    कॅनडा – कॅनडा मधील फेडरल आणि प्रांतीय सरकारांनी LGBTQ जोडप्यांच्या लग्नाला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर समलिंगी जोडप्यांना १९९९ पासून कायद्याचे अभय मिळाले होते. यानंतर संपूर्ण कॅनडामध्ये लग्नासंबंधी कायदा असावा, अशी चळवळ उभी राहिली. १३ पैकी ९ राज्यांनी असा कायदा करावा, अशी जोरदार मागणी केली. त्यानंतर २० जुलै २००५ साली कॅनडाच्या संसदेने राष्ट्रीय स्तरावर कायदा संमत करून संपूर्ण देशाला लागू केला.

  • 11/11

    जर्मनी – ३० जून २०१७ रोजी समलिंगी जोडप्यांना लग्न करण्याची परवानगी देणारा कायदा करणारा जर्मनी हा १५ वा युरोपियन देश ठरला. अँजेला मर्केल यांनी संसदेत कायदा पारित करण्यासंबंधी मतदान करण्याची घोषणा केली. मर्केल यांनी सत्ताधारी पक्ष ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनच्या सदस्यांना त्यांच्या विवेकनुसार मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ३९३ पैकी २२६ मते विवाहाला मान्यता देणाऱ्या बाजूने पडली. मर्केल यांनी मांडलेल्या विधेयकाच्या बाजूने कन्झर्व्हेटिव्ह ब्लॉकच्या ७० हून अधिक सदस्यांनी मतदान केले. (या देशांमध्ये आहे समलिंगी विवाहाला मान्यता (फोटो – इंडियन एक्स्प्रेस))

TOPICS
प्रेम विवाहLove Marriageमराठी बातम्याMarathi News

Web Title: Same sex marriage verdict this country allows same sex marriage sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.