• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. amruta fadnavis marathi look in yellow muniyar paithani wore for kartiki ekadashi sgk

PHOTOS : पिवळ्या पैठणीत अमृता फडणवीसांचा मराठमोळा साज, शासकीय पूजेसाठी नेसलेल्या साडीची चर्चा!

आज गुरुवार (दि.२३) कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठुराया आणि रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली.

Updated: November 23, 2023 20:47 IST
Follow Us
  • कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठुराया आणि रखुमाईची शासकीय पूजा झाली. (फोटो - देवेंद्र फडणवीस/एक्स)
    1/11

    कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठुराया आणि रखुमाईची शासकीय पूजा झाली. (फोटो – देवेंद्र फडणवीस/एक्स)

  • 2/11

    कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा करण्याचा मान मिळतो. यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने हा मान कोणाला मिळणार यावर बरीच चर्चा झाली. परंतु, हा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. (फोटो – देवेंद्र फडणवीस/एक्स)

  • 3/11

    याबाबतचे फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. (फोटो – देवेंद्र फडणवीस/एक्स)

  • 4/11

    अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. त्यांच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे ते सोशल मीडियाद्वारे अपडेट्स देत असतात. (फोटो – देवेंद्र फडणवीस/एक्स)

  • 5/11

    तसंच, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या फॅशन सेन्सकडेही नेटिझन्सचं बारीक लक्ष असतं. कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय पूजेला त्यांनी नेसलेल्या साडीकडे अवघ्या महिला वर्गाचं लक्ष गेलं आहे. (फोटो – देवेंद्र फडणवीस/एक्स)

  • 6/11

    अमृता फडणवीस यांनी शासकीय पूजेसाठी पिवळ्या रंगाची मुनियार पैठणी नेसली होती. (फोटो – देवेंद्र फडणवीस/एक्स)

  • 7/11

    या पिवळ्या मुनियार पैठणीवर लाल आणि हिरव्या रंगाच्या वेली आहेत. (फोटो – देवेंद्र फडणवीस/एक्स)

  • 8/11

    थ्री फोर्थ बाह्यांचं त्यांचं ब्लाऊज या साडीवर अत्यंत सुंदर दिसतंय.(फोटो – अमृता फडणवीस/एक्स)

  • 9/11

    मुनियार पैठणी, गळ्यात नाजूक ठुशी आणि केसांत गजरा यामुळे त्यांचा मराठमोळा लूक उठून दिसतोय. (फोटो – अमृता फडणवीस/एक्स)

  • 10/11

    श्री विठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहू देत, सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना या फडणवीस दाम्प्त्याने आज विठूरायाचरणी केली. (फोटो – अमृता फडणवीस/एक्स)

  • 11/11

    नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन घुगे दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे. (फोटो – अमृता फडणवीस/एक्स)

TOPICS
अमृता फडणवीसAmruta Fadnavisदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi News

Web Title: Amruta fadnavis marathi look in yellow muniyar paithani wore for kartiki ekadashi sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.