-

अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्ला विराजमान झालेले आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचा दरबार २३ जानेवारीपासून जनतेसाठी खुला करण्यात आला आहे.
-
भारतातील अनेक राज्यातून लोक प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत. प्रभू रामाच्या दर्शनासाठी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
-
मंदिराचे दरवाजे उघडताच लोकांची मंदिरात जाण्यासाठी झुंबड उडाली.
-
मंदिराचे दरवाजे उघडताच भाविकांनी ‘जय श्री राम’ असा जयघोष करत मंदिरात प्रवेश केला.
-
दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली असून त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
-
पहिलाच दिवस असल्याने काहीसा गोंधळ उडाला. जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला.
-
येत्या काही दिवसांत येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
-
२२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाच्या मूर्तीवर अभिषेक केला होता.
-
पंतप्रधान मोदींनी पुजार्यांसोबत मुख्य विधी पार पाडले होते. यावेळी देशातील अनेक नामवंत व्यक्ती अयोध्येत पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात सुमारे ७००० लोक सहभागी झाले होते. (फोटो स्रोत: पीटीआय)
(हे देखील वाचा: अयोध्येच्या राम मंदिराचे मनाला भुरळ घालणारे, सुंदर फोटो पाहा… )
अयोध्या राम मंदिर : रामलल्लाचा दरबार सर्वसामान्यांसाठी खुला होताच भाविकांची झाली मोठी गर्दी.
रामलल्लाचा दरबार उघडताच भाविकांची मोठी गर्दी झाली. रामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक अयोध्येत पोहोचले आहेत. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
Web Title: Massive devotees flock to ayodhya ram mandir as doors open after pran pratishtha jshd import dha