• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. cyclone remal how many types of storms are there remal storm in bay of bengal spl

Cyclone Remal: वादळं किती प्रकारची असतात; कशी ठरवतात श्रेणी? ‘रेमल’ चक्रीवादळाच्या निमित्ताने वाचा संपूर्ण माहिती

Cyclone Remal update, storm in bay of bengal, How many types of storms : रेमल चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते तसेच या चक्रीवादळामुळे हवेचा वेग हा तब्बल १३५ किमी/ताशी असा असू शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Updated: May 26, 2024 20:26 IST
Follow Us
  • cyclone update
    1/9

    पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकणार आहे, त्यामुळं या पट्ट्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Photo- PTI)

  • 2/9

    रेमल चक्रीवादळ पूर्व भारतातील राज्यांत दाखल होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे जोरदार वारे वाहू शकतात तसेच बेमोसमी पाऊसही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील काही वर्षात अनेक वादळे येऊन गेली आहेत, त्यामुळे तुम्ही कधी विचार केलाय का की वादळांचे प्रकार कसे पडतात, हवामान खात्याकडून कसे ठरवले जाते कोणत्या वादळाची तीव्रता किती असेल? चला तर मग याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेऊया. (Photo- PTI)

  • 3/9

    सर्वात आधी ‘रेमल’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ‘रेमल’ हा एक अरबी शब्द असून या शब्दाचा अर्थ वाळू असा होतो. रेमल हे नाव ओमान देशाने दिले आहे. (Photo- PTI)

  • 4/9

    वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गेनाइजेशन (WMO) या संस्थेने वादळांचे ५ प्रकारात वर्गीकरण केले आहे आणि श्रेणी ठरवल्या आहेत. (Photo- PTI)

  • 5/9

    ११९ ते १५२ किमी ताशी या वेगाने वारे वाहत असतील तर अशा वादळाला पहिल्या श्रेणीत गणले जाते. पहिल्या श्रेणीमध्ये जास्त नुकसान होण्याची शक्यता नसते. (Photo- PTI)

  • 6/9

    दुसऱ्या श्रेणीत वाऱ्याचा वेग १५४ ते १७० किमी प्रति तास असणारी वादळे येतात. यामध्ये काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. (Photo- PTI)

  • 7/9

    वादळांच्या तिसऱ्या श्रेणीमध्ये १७८ पासून २०८ किमी प्रति तास वेगानं वारे वाहू लागतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. (Photo- PTI)

  • 8/9

    २०९ ते २५१ किलोमीटर प्रति तास वेगानं जेव्हा वारे वाहतात तेव्हा ती वादळे चौथ्या श्रेणीत गणली जातात. या श्रेणीतील वादळे मोठमोठ्या इमारती सुद्धा पाडू शकतात इतकी ताकद या वादलांमध्ये असते. (Photo- PTI)

  • 9/9

    पाचव्या आणि शेवटच्या श्रेणीतील वादळं सगळ्यात जास्त हानिकारक असतात. यामध्ये वाऱ्याचा वेग २५० किमी प्रति तास असतो आणि यापुढेही वेग वाढला जाऊ शकतो. या वेगात मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो, मृत्युदेखील ओढवू शकतात. (Photo- PTI) हे देखील वाचा – धक्कादायक! राजकोटमधील गेमिंग झोनकडे अग्निशमनचे नाहरकत प्रमाणपत्रच नव्हते; होता तीन हज…

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Cyclone remal how many types of storms are there remal storm in bay of bengal spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.